शाकाहारी 60 तर चिकन थाळी 120 रुपयांत; निवडणुकीसाठी दरपत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या खर्चाचा तपशील नियमित सादर करावा लागणार आहे. त्यासाठी खर्च सनियंत्रण समितीही नियुक्‍त केली आहे. या समितीकडून निश्‍चित केलेल्या दरात शाकाहारी थाळीसाठी 60 तर चिकन थाळीसाठी 120 रुपये मोजावे लागणार आहेत.

रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या खर्चाचा तपशील नियमित सादर करावा लागणार आहे. त्यासाठी खर्च सनियंत्रण समितीही नियुक्‍त केली आहे. या समितीकडून निश्‍चित केलेल्या दरात शाकाहारी थाळीसाठी 60 तर चिकन थाळीसाठी 120 रुपये मोजावे लागणार आहेत. सभांमध्ये नेत्यांना घातले जाणारे फेटे 120 रुपयांना, तर बिल्ल्यांना 10 रुपये असा खर्च लावावा लागणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराला मतदारापर्यंत पोचताना प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. यासाठी त्यांना लागणारी वाहने, सभेला लागणारे स्टेज, कार्यकर्त्यांचा जेवण, नाश्‍ता याचा खर्च, रोजच्या रोज द्यावा लागत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या दर पत्रकानुसार जाहीर प्रचार सभांना प्रति दिवस 5 हजार रुपये दर आहे. निवडणूक प्रचार कार्यालयाचा दर दिवसाचा दर रुपये दोन हजार, कॉर्नर सभा प्रतिदिन दोनशे, रॅली प्रतिदीन दोनशे आणि सोबत जीएसटीदेखील आकारण्यात येणार आहे. बॅनर, प्लास्टिक, कापडी झेंडे, होर्डिंग, पोस्टर कट आऊट, डिजिटल बोर्ड, गेट, रोषणाई, हॅन्ड बिल यासाठी 25 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत दर प्रति नग दिला आहे. 

व्हिडिओ, ऑडिओ कॅसेटसाठी प्रति नग 120 रुपये दर आहे. उमेदवारांना प्रचारासाठी वाहनाची गरज असल्याने चालकास 1000 रुपये, तर वेगवेगळ्या वाहनांसाठी 2 हजार 500 रुपयांपासून 10 हजार रुपये दर ठरविला आहे. तसेच इंधन दर वेगळा जोडलेला आहे. नाश्‍तासाठी 15 रुपयांपासून 25 रुपये दर व जेवणासाठी 50 पासून 200 रुपये दर दिलेला आहे. पुष्पगुच्छ दर 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत तर नारळाचा दर पंधरा रुपये निश्‍चित केला आहे. फटाक्‍यांची माळ प्रतिनग 730 रुपयांपासून 6 हजार 700 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे खर्चाचे हे आकडे बघितल्यानंतर एका उमेदवारास रोजच्या खर्चात काटकसर करावी लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetarian meal 60 and Chicken meal 120 Rs. Rate for Election