'ती' मोटार बेवारस नसल्याचे स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

सावंतवाडी - येथील एस.पी.के. कॉलेजसमोर गेल्या पाच दिवसांपासून बेवारस स्थितीत मोटार असल्याचे पुढे आले होते; मात्र तिच्या मालकाचा शोध लागला आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच ठिकाणी पाच दिवस बेवारस स्थितीत असलेल्या मोटारबद्दल पोलिस यंत्रणेने गांभीर्य घेतले नसल्याने त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त होत आहे. मात्र, गाडीत सापडलेल्या कागदपत्रावरून मालकाशी लवकरच संपर्क होणार असून ती गाडी बंद पडल्यामुळे पार्क करून ठेवली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

येथील एस. पी. के. कॉलेजसमोरील असलेल्या रिक्षा स्टॅंडला लागूनच अज्ञात व्यक्‍तीने मोटार उभी करून ठेवली होती. येथील रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार ही गाडी शनिवारपासून तेथेच होती. रिक्षा स्टॅंडच्या आजूबाजूच्या परिसरात हॉटेल असल्यामुळे पर्यटकाची गाडी असल्याच्या अंदाजाने मोटारीकडे फारसे लक्ष दिले नाही; परंतु चार दिवस झाले तरी मोटारजवळ कोणीच फिरकले नसल्याने शहरातील काही स्थानिकांचा व रहिवाशांचा या मोटारबाबत तर्कवितर्क व्यक्‍त केला जाऊ लागला.

Web Title: That vehicle is not abandoned