'स्वच्छ'मध्ये वेंगुर्ला नगरपरिषद देशात अठरावी

अमोल टेंबकर
शनिवार, 23 जून 2018

राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात वेंगुर्ला नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक प्राप्त केला आहे.

सावंतवाडी : राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात वेंगुर्ला नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यापाठोपाठ जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी या दोन्ही  नगरपरिषद यशस्वी ठरल्या असून, कणकवली 36 तर अनेक वेळा स्वच्छता अभियानासाठी यशस्वी ठरलेले सावंतवाडी नगरपालिका 64 नंबर वर आहे.

आज या अभियानाचा अहवाल इंटरनेटच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला. यामध्ये देशात पहिला येण्याचा मान पाचगणी नगरपरिषदेला मिळाला आहे. एक लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती सावंतवाडी नगरपालिकेचे संबंधित विभागाचे समन्वयक शहाजी चव्हाण यांनी दिली

Web Title: Vengurla Municipal Council is Clean eighteen in the country