'वेताळबांबर्डेचा विकास करणार'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

कुडाळ - वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसैनिकांनी विजयोत्सव साजरा केला. सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास विविध योजनांच्या माध्यमातून करणार, असे खासदार विनायक राऊत यांचे स्वीय सहाय्यक तथा जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी सांगितले.

कुडाळ - वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसैनिकांनी विजयोत्सव साजरा केला. सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास विविध योजनांच्या माध्यमातून करणार, असे खासदार विनायक राऊत यांचे स्वीय सहाय्यक तथा जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी सांगितले.

तालुक्‍यात वेताळबांबर्डे हा नवीन जिल्हा परिषद मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात शिवसेना व काँग्रेस अशी दुरंगी लढत झाली; मात्र १७ केंद्रांवर ४ केंद्रे वगळता उर्वरित एकाही केंद्रावर उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा मतांनी खूप पिछाडीवर होता. श्री. परब यांचा जनसंपर्क चांगला असल्याने तसेच खासदार विनायक राऊत यांचे ते स्वीय सहाय्यक असल्याने भागाबरोबरच तालुक्‍यातही त्यांचा जनसंपर्क होता. मतदारांनी त्यांना दिलेला कौल हा विकासाचा कौल गृहीत धरून श्री. परब यांनी या भागाच्या विकासाकडे वाटचाल केली. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेसनेही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पंचायत समिती सदस्य आनंद भोगले रिंगणात होते; मात्र मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान करून भगवा फडकवला. आवळेगाव पंचायत समितीमध्ये शीतल कल्याणकर या शिवसेनेच्या, तर काँग्रेसच्या नूतन आईर या वेताळबांबर्डेमधून विजयी झाल्या. वेताळबांबर्डे येथे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी स्नेहा दळवी यांना अवघ्या शंभर मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 

श्री. परब म्हणाले, ‘‘वेताळबांबर्डे मतदारसंघात बराचसा शेतकरी वर्ग आहे. त्यांचे मूलभूत प्रश्‍न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मी काम करणार आहे. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, तसेच आमदार वैभव नाईक हे माझे मार्गदर्शक आहेत. त्यांनी केलेली विकासकामे आणि मतदारांशी ठेवलेला जनसंपर्क हीच माझ्या यशाची शिदोरी असून शिवसैनिकांची साथ महत्त्वाची ठरली.’’

Web Title: vetal bambarde development