Vidhan Sabha 2019 : राणे काँग्रेससारखीच भाजपची स्थिती करतील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

कुडाळ - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर जुन्या काँग्रेसची अवस्था केली तीच अवस्था भाजपची करणार आहेत. आपल्या माणसांना सोबत घेऊन भाजप पक्षाचे अस्तित्व ते दाखवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी केले.

कुडाळ - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर जुन्या काँग्रेसची अवस्था केली तीच अवस्था भाजपची करणार आहेत. आपल्या माणसांना सोबत घेऊन भाजप पक्षाचे अस्तित्व ते दाखवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी केले.

शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. यावेळी श्री. सावंत बोलत होते.

विधानसभेची निवडणूक 21 ऑक्‍टोबरला होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथील विधानसभा मतदारसंघात पक्ष अपक्षसह सात उमेदवार रिंगणात आहेत. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्री. नाईक यांनी निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन येथील ज्येष्ठ नागरिक सुवर्णकार भाऊ पाटणकर यांच्या हस्ते झाले.

श्री. सावंत पुढे म्हणाले, ""या निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युतीचा धर्म पाळताना भविष्यात राणे काय करणार याची सतत जाणीव ठेवून काम करावे.''

श्री. नाईक म्हणाले, ""गेली पंधरा वर्षे मी मतदारसंघात कार्यरत आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार असताना गेल्या पाच वर्षात सातत्याने या भागात कार्यरत राहिलो आहे. आमदार होण्यासाठी, मला विजयी करण्यासाठी शिवसैनिक व मतदारांनी जीवाचे रान केले. गेल्या पाच वर्षात राज्यातील सर्व योजना याठिकाणी आणण्याचे मी प्रामाणिक काम केले आहे. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विविध योजना आणण्यासाठी मी कार्य करत राहिलो. विरोधकाकडे कोणतेही प्रचाराचे मुद्दे नाहीत. कोणतेही विकासात्मक मुद्दे नसताना ते आमच्या मुद्‌द्‌यावर विरोधी बोलून येतील मतदारांची दिशाभूल करणार आहेत. त्यांना भाषणातून जनसंपर्कमधून चोख उत्तर देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या उंचावलेल्या आलेखानुसार शिवसैनिक मतदार हे निश्‍चितच मोठ्या प्रमाणात मतदानाचा कौल माझ्या बाजूने करतील यात तीळमात्र शंका नाही. आमचा लढा हा भाजपच्या विरोधात नाही तर नारायण राणे यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आमच्यासाठी पैशापेक्षा माणसे फार महत्त्वाची आहेत.''

उद्धव ठाकरे 16 ला सिंधुदुर्गात
विधानसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 16 ऑक्‍टोबरला जिल्हा दौऱ्यावर उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल बंगे, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, नगरसेवक सचिन काळप, सुशील चिंदरकर, संतोष शिरसाठ, संदीप म्हाडेश्वर, जयभारत पालव, नितीन सावंत, डॉ सुबोध माधव, राजीव गवंडे, महेंद्र वेंगुर्लेकर, बबन बोभाटे, संजय भोगटे, नाईक नागेश, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, सिद्धेश धुरी, नितीन राऊळ, सतीश कुडाळकर, विजय नाईक, निनाद हिर्लेकर, अब्दुल साठी, अक्रम साठी आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Amarsen Sawant comment on Narayan Rane