Vidhan Sabha 2019 : नीतेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री; यातच सेनेचा विजय 

Vidhan Sabha 2019 :  नीतेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री; यातच सेनेचा विजय 

देवगड - माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आपला भाजप प्रवेश दिल्लीत होणार असल्याचे सांगत होते; मात्र नीतेश राणे यांचा भाजप प्रवेश गल्लीतच झाला. मागील निवडणूकीत हरवलेल्या प्रमोद जठार यांच्याच हस्ते त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला. एकेकाळी नारायण राणे स्टार प्रचारक होते; मात्र आता त्यांच्या मुलाला प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागते, यातच शिवसेनेची विजयी घोडदौड असल्याची टीका शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी आज येथील पत्रकार परिषदेत केली. 

यावेळी जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, संजय जगताप, निनाद देशपांडे उपस्थित होते.

येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दुधवडकर म्हणाले, ""तालुक्‍यातील जिल्हा परिषद गटनिहाय आपला प्रचार दौरा सुरू असूून गावागावांतून उमेद वाढवणारा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ज्यांनी दुःख दिले, त्यांचा पाडाव करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. शिवसेनेत मुख्यमंत्री असताना राणेंची स्टार प्रचारक म्हणून राज्यभर ओळख होती. आता त्यांना पंचायत समिती मतदारसंघात बैठका घेऊन फिरावे लागते. कामासाठी आलेल्या जिल्हा बॅंक कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात नेऊन अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून दुष्ट प्रवृत्तीचा अंत करून सावंत विजयी घोडदौड करतील. नाणार प्रकल्पाला विरोध करणारे आता मतांसाठी मांडीला मांडी लावून बसले असून प्रकल्पबाधीत जनताच त्यांना धडा शिकवील. राणे सोडून भाजपने कोणालाही उमेदवारी द्यावी, शिवसेना प्रचारात उतरेल, असे नेत्यांना सांगितले होते. आता सावंत पंधरा हजाराच्या मताधिक्‍याने विजयी होतील.'' 

आता गोगटे प्रचारात कसे? 
लोकसभा निवडणुकीत युतीचे विनायक राऊत उमेदवार असताना भाजपचे माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता एका रात्रीत असा काय चमत्कार झाला आणि नीतेश राणे यांच्या प्रचारात उतरले? असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे. "रक्‍त आटले तरी काम करणार नाही, म्हणणारे भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर प्रचारात आहेत. शिवसेना संपवण्याची भाषा करणारे, शिवसेना बुडवायला निघालेल्यांना आता स्वतःचा पक्ष बुडवण्याची वेळ आली असल्याची टीका विलास साळसकर यांनी केली. 

उध्दव ठाकरेंचा उद्या जिल्हा दौरा 
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बुधवारी (ता.16) जिल्हा दौऱ्यावर येत असून 3 वाजता कणकवली, 5.30 वाजता कुडाळ आणि 7 वाजता सावंतवाडीत प्रचारसभा घेतील, असे अरूण दुधवडकर यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com