Vidhan Sabha 2019 : सावंतवाडीत अपक्ष उमेदवाराच्या शक्तीप्रदर्शनात झळकले भाजपचे झेंडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

सावंतवाडी - भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तेली यांनी काढलेल्या मिरवणुकीत कमळ चिन्ह असलेला भाजपचा झेंडा व टोप्या झळकल्यानेच सर्वाच्याच भुवया उंचावल्या. तत्पूर्वी झालेल्या मेळाव्यात सालईवाडा येथील रविंद्र मंगल कार्यालय गर्दीने खचाखच भरले होते. 

सावंतवाडी - भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तेली यांनी काढलेल्या मिरवणुकीत कमळ चिन्ह असलेला भाजपचा झेंडा व टोप्या झळकल्यानेच सर्वाच्याच भुवया उंचावल्या. तत्पूर्वी झालेल्या मेळाव्यात सालईवाडा येथील रविंद्र मंगल कार्यालय गर्दीने खचाखच भरले होते. 

एकीकडे शिवसेना, भाजप, रिपाई, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार म्हणुन केसरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असतांनाच राजन तेली यांच्या समर्थनार्थ मतदार संघातील भाजप कार्यकत्यानी केलेली गर्दी लक्षवेधी होती. राजन तेली आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी शहर दुमदुमून सोडले. यावेळी रविंद्र मंगल कार्यालय ते प्रांत कार्यालय अशी मिरवणुक काढत तिचा समारोप गवळी तिठा येथे करण्यात आला.

त्यानंतर राजन तेली यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याजवळ उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, वेंगुर्ले भाजप तालुकाध्यक्ष बाळू देसाई, दोडामार्ग भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जेष्ठ भाजप कार्यकर्ते तथा माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे आदी उपस्थित होते.

श्री. तेली यांनी मंत्री केसरकर यांच्या विरोधात अलीकडे बंड थोपटले होते. शत प्रतिशत भाजप या नाऱ्याप्रमाणे सावंतवाडीची जागा भाजपच लढविणार असेही तेली व पदाधिकाऱ्यांनी वारंवार जाहीर केले होते; मात्र युतीच्या तिठ्यामुळे या जागेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला होता. राजन तेली यांनी भाजपची ध्येय धोरणे गावागावात पोहोचवून भाजप वाढविण्याचे काम गेले पाच वर्ष करत आले आहेत. त्यांनी केलेल्या कामामुळे तेली यांनाच भाजपची उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी होती. वेंगुर्ले तालुक्‍यातील काहींनी राजीनामे देण्याचीही मागणी केली होती.

त्याच पार्श्‍वभूमीवर तेलींना असलेला कार्यकर्त्यांचा पाठिंबा लक्षात घेता आज तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतांनाही झालेली भाजप कार्यकर्त्यांची गर्दी यावरुन लक्षात आली. एकुणच सालईवाडा व प्रांत कार्यालय इथपर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजपचे झेंडे फडकत असल्याने सगळ्याचेचे डोळे वटारल्याचे दिसून आले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 BJP flag seen in independent candidate Rajan Teli ralley