Vidhan Sabha 2019 : राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येणार कणकवलीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कणकवली - कणकवली विधानसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षामध्ये लढत होत आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत.

कणकवली - कणकवली विधानसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षामध्ये लढत होत आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत.

कणकवलीत 15 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता ही सभा होणार आहे. यामुळे या सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपच्या आपले सरकारची राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेची माहिती दिली. आमदार नितेश राणेही या बैठकीला उपस्थित होते.  श्री. दरेकर म्हणाले, महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जनमाणसात पोहोचविण्याचा प्रयत्न होता. येत्या दोन वर्षात सिंधुदुर्गात साखर कारखाना उभारू, जिल्हा बँकेमध्ये भाजपची सत्ता आणू असा दावाही यावेळी श्री. दरेकर यांनी केला. भाजप विरोधात दिलेला उमेदवार हा नैराश्यपोटी आहे अशी टिकाही त्यांनी केली. नितेश राणेंना भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Chief Minister public meeting in Kankavali for Nitesh Rane