Vidhan Sabha 2019 : ...यासाठी चिपळूण भाजपने केली तलवार म्यान

BJP Shivsena
BJP Shivsena

संगमेश्वर - अखेर शिवसेनेचा जाहीर निषेध करण्याबाबत चिपळूण तालुका भाजपने आपली तलवार म्यान केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कणकवलीतील सभेत राणेंवर जोरदार प्रहार करत भाजपला शुभेच्छा दिल्या होत्या.

त्या आधी कणकवलीतील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कोणत्याही प्रकारची टिका केली नव्हती. याच सभेत नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार शिवसेनेवर टिका करणे टाळले होते. तरीही ठाकरे यांनी राणेंवर टिका केल्याने याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाले होते. 

काल संध्याकाळपासून चिपळूणमधील कार्यकर्त्यांची शिवसेनेचा निषेध करण्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. त्यासाठी आज सकाळी ११ वाजता एका ठिकाणी जमण्याचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे आज चिपळूण भाजप नक्की काय करणार याबाबत उत्सुकता वाढली होती. मात्र आज दिवसभरात यातले काहीही न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

याबाबतीत खात्रीशीर माहितीनुसार, सिंधुदुर्गमध्ये युती तुटली आहे, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ती कायम असल्यानें इथे निषेध नको अशी चर्चा सेना भाजपमध्ये झाली. त्यानंतर भाजपची तलवार म्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com