Vidhan Sabha 2019 : चिपळूण - संगमेश्‍वरात रंगणार तिरंगी सामना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

चिपळूण - विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण- संगमेश्‍वर मतदार संघात पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील वंचितच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला होता. तर भाजपचे बंडखोर तुषार खेतल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत तलवार म्यान केली. परिणामी चिपळूणात तिरंगी सामना रंगणार असून शेखर निकम आणि सदानंद चव्हाण यांच्यात बिग फाईट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतर्फे शेखर निकम, महायुतीतर्फे सदानंद चव्हाण, तर बसपा तर्फे सचिन मोहिते या तिघे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात राहिले आहेत.  वंचित बहुजन आघाडीचे प्रफुल्लचंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बाद झाला. तर भाजपचे तुषार खेतल यांना एबी फॉर्म मिळाला नाही. शिवाय अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज आज त्यांनी मागे घेतला. बसपाचे सचिन मोहिते किती मते घेणार याची उत्सुकता आहे.

गत निवडणुकीत चव्हाणांचा 6 हजार मतांनी विजय झाला होता. त्यावेळी भाजप स्वतंत्रपणे लढला. भाजपचे माधव गवळी यांना सुमारे 10 हजार मते मिळाली होती. आता भाजप सेना युती झाल्यामुळे सेना आमदारांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. पराभव झाल्यापासून निकमांनी गावोगावच्या वाड्या पिंजून काढल्या.

मतदारांशी नियमित संपर्क ठेवून पक्ष प्रवेश घेतला. स्वखर्चातून कोट्यवधीची कामे केली. सुमारे दोनशे पाणी योजना स्वखर्चातून राबवल्या. त्यामुळे आता नाही, तर कधीच नाही. या इराद्याने कार्यकर्ते निवडणुकीचा प्रचार करीत आहेत. चव्हाणांची भिस्त संघटनेवर तर निकमांची कार्यकर्त्यावर आहे. त्यामुळे निकम आणि चव्हाण यांच्यातील लढत अधिक रंगतदार होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Chiplun Sangmeshwar constituency