Vidhan Sabha 2019 : शक्तीप्रदर्शनाने कुडाळात दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

टीम ई सकाळ
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

कुडाळ - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष जाईल, असा अपक्ष आमदार म्हणून मला विजयी करा. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन, मी कोणावर टिका करणार नाही, असे प्रतिपादन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी आज केले. 

कुडाळ - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष जाईल, असा अपक्ष आमदार म्हणून मला विजयी करा. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन, मी कोणावर टिका करणार नाही, असे प्रतिपादन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी आज केले. 

श्री. सामंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज हजारोंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करीत दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आज स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयासमोर झाली.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, विकास कुडाळकर, विनायक राणे, अंकुश जाधव, दादा साईल, सुमेधा पाताडे, बाळू कोळंबकर, सुदेश आचरेकर, मंदार लुडबे, रुपेश कानडे, आबा धडाम, राकेश कांदे, भाऊ सामंत, पांडुरंग कोंडस्कर, विशाल परब, दिनेश साळगावकर, दीपक नारकर, बाळकृष्ण मडव, सुभाष मडव, मामा माडये, अशोक तोडणकर, बाळू कुबल, राजा सामंत, संध्या तेरसे, प्रकाश मोर्ये कार्यकर्ते उपस्थित होते. 

सामंत म्हणाले, ""मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या कारकिर्दीत 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे चित्र आता बदलले आहे. गेले काही दिवस राणे यांना प्रवेश देतात की नाही या त्यांच्या भाजपाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून आमच्या सोबत राहिलात. खरोखरच तुम्ही त्यांचे शिलेदार आहात. आज माझा अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही हजारोच्या संख्येने आलात. मी अपक्ष असताना तुम्ही जी साथ दिली ती कधीच विसरू शकणार नाही. गेल्या 35 वर्षानंतर आज स्थानिक उमेदवाराला याठिकाणी संधी मिळाली. मी कोणावर टीका करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात आजची भव्य मिरवणूक पाहून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष जाईल.''

रणजित देसाई म्हणाले, ""दत्ता सामंतच्या रुपात एक मोठे वादळ कुडाळमध्ये थडकले आहे. ही विरोधकांना मोठी चपराक आहे. एवढी गर्दी पाहून विरोधकांची पायाखालची वाळू घसरली. आता या मतदारसंघात स्थानिक उमेदवार आहे. बाहेरच्या उमेदवाराची गरज नाही. येथील आमदार यापूर्वीच निवडले आहे फक्त शिक्कामोर्तब करायचे आहे. अपक्ष उमेदवाराला विजयी करण्यासाठी ऐतिहासिक नोंद करूया.''

विकास कुडाळकर म्हणाले, ""दत्ता सामंत आमदार होणार. स्थनिक उमेदवाराला निवडून द्या. मोठया मतांनी विजयी करूया. 25 हजाराचे मताधिक्‍य देण्यासाठी काम करा. भाऊ सामंत यांनी ऐतिहासिक नोंद करूया असे आवाहन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Datta Samant Fill form from Kudal