Vidhan Sabha 2019 : दत्ता सामंत कुडाळातून लढणार 

Vidhan Sabha 2019 : दत्ता सामंत कुडाळातून लढणार 

मालवण - स्वाभिमानच्या कुडाळ - मालवण तालुक्‍यातील राणेसमर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत कुंभारमाठ येथे बैठक घेतली. यात स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत हे कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात आल्याचे समजते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. येत्या शुक्रवारी (ता.4) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत श्री. सामंत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कुडाळ-मालवणच्या राणेसमर्थकांनी आज सायंकाळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत कुंभारमाठ येथे बैठक घेतली. या बैठकीस दोन्ही तालुक्‍यांतील राणे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून देवदत्त सामंत यांच्या नावाचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या आग्रहानुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्यापर्यंत पोचविल्या जाणार असल्याची माहिती स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, संध्या तेरसे, नीलिमा सावंत, सभापती सोनाली कोदे, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, बाबा परब, अशोक बागवे, सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, राजा गावडे, मंदार लुडबे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

या विधानसभा निवडणुकीत 25 हजारांच्या मताधिक्‍यांनी निवडून येऊ. गेली 35 वर्षे कुडाळ मतदारसंघात स्थानिक उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवार म्हणून या निवडणुकीस सामोरे जाणार आहे. किनारपट्टी भागातील बंधाऱ्याचा प्रश्‍न तीन महिन्यात सोडविणार, अन्यथा तीन महिन्यांनंतर आमदारकीचा राजीनामा देऊ, असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केल्याचे कळते. भाजपचे पदाधिकारी भाऊ सामंत यांनी या निवडणुकीत भाजपनेही आमदार वैभव नाईक यांना कोणतीही मदत न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com