VIdhan Sabha 2019 : वैभववाडीत पाच मतदान केंद्रावर बिघाड

Voter line in Kusure polling center
Voter line in Kusure polling center

वैभववाडी - विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान होत असताना आज सकाळी तीन केंद्रावरील व्हीव्ही पॅड मध्ये तांत्रिक दोष आढळुन आले तर मतदान प्रकिया सुरू झाल्यानंतर दोन मतदान केंद्रातील मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे त्याठिकाणी दहा ते पंधरा मिनिटांचा खंड पडला. तालुक्‍यात सर्वत्र चुरशीने मतदान सुरू होते. मतदारांना मतदान केंद्रांपर्यत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये चढाओढ दिसुन येत होती.

विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्‍यात आज सकाळी सात वाजल्यापासुन मतदान प्रकियेला सुरूवात झाली. अतिशय चुरशीची लढत होत असलेल्या कणकवली मतदारसंघातील वैभववाडी तालुक्‍यातील कोकिसरे, करूळ आणि कुसुर या तीन मतदान केंद्रांतील व्हीव्ही पॅडमध्ये तांत्रिक दोष आढळुन आला. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी झोनल अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यातील दोष दुर केले.

पंधरा ते वीस मिनिटांत व्हीव्ही पॅडमधील दोष दुर करून मतदान प्रकिया सुरू करण्यात आली. त्यानंतर नानीवडे आणि कुंभवडे मतदान केंद्रातील मतदानयंत्रात बिघाड झाला. त्यामुळे काही काळ त्या केंद्रावरील मतदान प्रकिया थांबविण्यात आली. 20 ते 25 मिनिटांत या दोन्ही मतदानयंत्रे बदलण्यात आली. त्यानंतर तेथील मतदान प्रकियाही पुर्ववत झाली.

तालुक्‍यातील सर्वच मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी गर्दी केली होती. मतदान प्रकिया सुरू झाल्यानंतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर घरोघरी जावुन मतदान करण्यासाठी प्रवृत्त करीत होते. मतदान केंद्रांपासुन लांब राहणाऱ्या मतदारांसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्‍यातील आदर्श केंद्र असलेल्या केंद्रशाळा खांबाळे मतदान केंद्राबाहेर मतदारांनी सकाळच्या सत्रात चांगली गर्दी केली होती. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पावसाच्या शक्‍यतेने सकाळच्या सत्रात मतदान करून घेण्यासाठी आग्रही होते.

तरूणांसह वयोवृध्द मतदारसुध्दा मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले. सध्या भातकापणी असल्यामुळे काही मतदार शेतकऱ्यांनी कापणीला जाण्यापुर्वी मतदानाचा हक्क बजावला तर काहींनी दुपारच्या सत्रात मतदान केले. महिलावर्ग सुध्दा सकाळपासुनच मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.

विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेद्‌वार सतीश सावंत यांनी तालुक्‍यातील अनेक मतदान केंद्राबाहेर जावुन आपल्या कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेतल्या. तर भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांनी देखील तालुक्‍यातील अनेक केंद्रावर जात कार्यकर्त्याशी हस्तांदोलन केले.

"तालुक्‍यातील नानीवडे आणि कुंभवडे येथे मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता; परंतु झोनल ऑफीसर तेथे पोहोचत तत्काळ दोन्ही मतदान केंद्रांवरील मतदान प्रकिया पुवर्वत केली. तीन मतदान केंद्रावर व्हीव्ही पॅडमध्ये किरकोळ दोष होते ते देखील तत्काळ दुर करण्यात आले.''
- रामदास झळके
, तहसिलदार वैभववाडी.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com