Vidhan Sabha 2019 : लाड यांना कुणबी बांधव म्हणून पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

राजापूर - बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजातील इच्छुकांना राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी उमेदवार म्हणून संधी द्यावी, या कुणबी समाजोन्नती संघाने केलेल्या आवाहनाला काँग्रेस व्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून रिंगणात उतरलेले कुणबी ज्ञातीबांधव अविनाश लाड यांना काँग्रेस पक्ष नव्हे तर, कुणबी ज्ञातीबांधव म्हणून पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय आज घेण्यात आला. 

राजापूर - बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजातील इच्छुकांना राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी उमेदवार म्हणून संधी द्यावी, या कुणबी समाजोन्नती संघाने केलेल्या आवाहनाला काँग्रेस व्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून रिंगणात उतरलेले कुणबी ज्ञातीबांधव अविनाश लाड यांना काँग्रेस पक्ष नव्हे तर, कुणबी ज्ञातीबांधव म्हणून पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय आज घेण्यात आला. 

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या राजापूर आणि ग्रामीण शाखा राजापूरच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामीण शाखेचे अध्यक्ष दीपक बेंद्रे यांनी दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्‍यातील कुणबी समाजाचा मेळावा नुकताच पार पडला. त्यामध्ये राजकीय पक्षांनी उमेदवारी निश्‍चित करताना बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजाच्या व्यक्तीला प्राधान्य द्यावे,अशी मागणी केली होती.

या मेळाव्यामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसमधील नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, शिवसेनेतून तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजापूर तालुका माजी संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून जिल्हाध्यक्ष नागरेकर यांची नावे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आली होती. कुणबी संघाने केलेल्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद आणि विधानसभेसंबंधित निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आज कुणबी समाजोन्नत्ती संघ, मुंबईच्या ग्रामीण शाखेची कार्यकारिणी आणि मुंबईचे पदाधिकारी यांची आज बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. 

या बैठकीमध्ये मागील मेळाव्यामध्ये उमेदवारीसंबंधित केलेल्या आवाहनाला राजकीय पक्षांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये गतवेळी विविध पक्षांकडून इच्छुक म्हणून चर्चेत आलेल्या नावांपैकी कुणबी संघाच्यावतीने लाड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, जिल्हा परिषद सदस्य दिपक नागले, प्रकाश कातकर, प्रकाश लोळगे आदी उपस्थित होते. 

लाड यांच्या प्रचारात उतरणार 
चर्चेमध्ये बेंद्रे यांच्यासह अरविंद डाफळे, ओबीसी समन्वय संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर, सुरेश बाईत, सुरेंद्र तांबे आदींनी मार्गदर्शन करताना कुणबी समाजाच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कुणबी संघाचे पदाधिकारी लाड यांच्या प्रचारात उतरणार असून त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बेंद्रे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Kunabi sena Support to Avinash Lad