Vidhan Sabha 2019 : कोकणात मनसे 'या' मतदार संघात लढणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

साडवली - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि चिपळूण- संगमेश्वर मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्हीही निवडणूक रिंगणात उतरणार असे जाहीर केले. देवरुख येथे मनसेने पत्रकार परिषद घेऊन श्रीपत शिंदे आणि जितेंद्र चव्हाण यांची नावे उमेदवारीसाठी श्रेष्ठींना कळवली असल्याचे जाहीर केले. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची ही मागणी आहे असे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर यांनी सांगितले.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मनसेचे चांगले संघटन उभे राहिले आहे. पक्षामार्फत बरीच कामे झालेली आहेत. पक्षनिरीक्षक संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी मतदार संघात फिरुन निवडणुकीची हवा जाणुन घेतले. मनसेला या मतदारसंघात चांगले वातावरण आहे असे त्याना सांगण्यात आले. ते खरे का ते त्यानी जाणुन घेतले आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तालुका संपर्क प्रमुख श्रीपत शिंदे आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण या दोघांपैकी एक उमेदवार आम्हांला पाहिजे, अशी मागणी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

2009 च्या निवडणुकीत सूर्यकांत सांळुखे हे उमेदवार होते. तेव्हा चांगली मते मनसेने घेतली होती असे कोचिरकर यांनी सांगितले. देवरुख पंचक्रोशितही मनसेचे चांगले काम आहे. मतदार संघात मनसेचे चांगले संघटन आहे. मनसेने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. सेना भाजप युती झाली नाही तर चौरंगी लढत होणार आहे.
पत्रकार परिषदेला सागर संसारे, ऋतुराज देवरुखकर, सरताज कापडी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Manase will fight from Chiplun Sangmeshwar