Vidhan Sabha 2019 : कणकवलीतील ती सभा राणेंची अन् कौतुक मात्र माझे - दीपक केसरकर

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

वेंगुर्ले - मुख्यमंत्र्यांच्या सभेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यात विकास झाला नाही, असा केलेला दावा मुख्यमंत्र्यांनीच जिल्ह्यात झालेल्या योजनांचा पाढा वाचून खोडून काढला. कणकवलीतील ती सभा राणेंची आणि कौतुक मात्र पालकमंत्री म्हणून माझे झाले, असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज तालुक्‍यातील गावभेट दौऱ्यात केला. 

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांचा वेंगुर्ले तालुक्‍यातील गावभेट दौऱ्यादरम्यान उभादांडा मतदारसंघातील अणसूर, असोली गावात कार्यकर्ते, ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी केसरकर यांच्या बैठकांना प्रतिसाद मिळाला. 

ते म्हणाले, ""भारतामध्ये कुठेही नाही अशी प्रगती करायची आहे. यामुळेच मी मंत्री झालो असून, आज या जिल्ह्यात पाच वर्षांत एक दंगल नाही. यामुळे याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली. वेंगुर्लेत राडा झाला आणि समीर नलावडे व गोट्या सावंत यांना शिक्षा झाली. का झाली तर तुम्ही या राडेबाज संस्कृतीच्या विरोधात उभे राहिलात. राडे करणारी प्रवृत्ती पुन्हा एकदा सावंतवाडी मतदारसंघात येण्याचा प्रयत्न करतेय. यामुळे या वृत्तीला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.'' 

शिवसेनेच्याच माध्यमातून अणसूर गावचा विकास झाला. गावात कोणालाही फिरकू देणार नाही. आमचं ठरलंय की केसरकर यांना अणसूर गावातून सर्वांधिक मताधिक्‍य मिळवून देणार, असा उपतालुकाप्रमुख संजय गावडे यांनी शब्द दिला. आसोली गावाला सर्वप्रथम सभापतिपद मिळाले. गावासाठी भरघोस निधी देऊन या गावचा विकास पालकमंत्री यांच्याच माध्यमातून झाला. यामुळे आसोली गावातून 80 टक्के मतदान केसरकर यांना मिळवून देणार, असा विश्‍वास सभापती सुनील मोरजकर यांनी व्यक्त केला. 

यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, सभापती मोरजकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, उपतालुकाप्रमुख संजय गावडे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांच्या कणकवलीच्या सभेत राणे यांनी कोणताही विकास झाला नाही, असे भाषण केले; मात्र याला मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात आलेल्या योजनांचा पाढाच वाचला. राणेंच्या सभा आणि कौतुक पालकमंत्र्यांचे झाले. 80 टक्के समाजकारण हा शिवबंधनाचा हेतू असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील नवीन क्रांती आणायची आहे. 
- दीपक केसरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com