Vidhan Sabha 2019 : कणकवलीतील भाजपची उमेदवारी कोणास ? समजणार चार तारखेला..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कुडाळ - कणकवलीतील उमेदवारीवरून अद्याप तिढा कायम असून या संदर्भात सिंधुदुर्गातील भाजप पदाधिकाऱ्यांची येथे कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात नितेश राणे यांना स्वतः राज्यमंत्री रवींद्र चव्हाण भाजप चिन्हाचा एबी फॉर्म देणार असल्याचे संकेत श्री. जठार यांनी दिले. 

कुडाळ येथे झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीची बैठकीस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार कोण याबाबत अद्याप तिढा कायम आहे. उमेदवारीबाबत निर्णय जाहीर करण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण चार तारखेला सिंधुदुर्गात येत आहेत. अशी माहिती श्री. जठार यांनी बैठकीनंतर दिली.

नारायण राणे जिल्ह्यात दाखल 
बांदा - माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी आमदार नितेश राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. गोव्यातून जिल्ह्यात येताना बांदा येथे राणे समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या प्रेमाने राणे भारावून गेले.

यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संतोष नानचे, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी, सरपंच अक्रम खान, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, ग्रामपंचायत सदस्य श्‍यामकांत मांजरेकर, संतोष सावंत, गुरुनाथ सावंत, सागर सावंत, मधुकर देसाई, आत्माराम गावडे आदी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Nitesh Rane candidacy issue remains