Vidhan Sabha 2019 : बाळ माने व समर्थकांना लाड यांच्या कानपिचक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी मुन्ना चवंडे यांची केलेली नियुक्ती योग्यच आहे. नियुक्तीनंतर उगवणारे आतापर्यंत कुठे होते. पक्ष कुणाच्या घरचा नाही, काम करणाऱ्यांची पक्षाकडून उचित दखल घेतली जाते, अशी कोपरखळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना दिली. 

रत्नागिरी - जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी मुन्ना चवंडे यांची केलेली नियुक्ती योग्यच आहे. नियुक्तीनंतर उगवणारे आतापर्यंत कुठे होते. पक्ष कुणाच्या घरचा नाही, काम करणाऱ्यांची पक्षाकडून उचित दखल घेतली जाते, अशी कोपरखळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना दिली. 

हॉटेल लॅण्डमार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत लाड म्हणाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून ऍड. दीपक पटवर्धन यांची नियुक्ती झाल्यापासून पक्षातील मरगळ झटकली गेली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. रत्नागिरी तालुकाध्यक्ष म्हणून नगरसेवक मुन्ना चवंडे याची तात्पुरती नियुक्ती केली होती.

लोकसभेच्या निवडणुकीत चवंडे यांनी युतीच्या उमेदवाराला चांगले मताधिक्‍य दिले होते. त्यांच्या कामाचा विचार करून जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी त्यांची तालुकाध्यक्ष म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती केली. बाळ माने यांनी तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या दादा दळी यांच्यासह अनेक समर्थकांची भाजप कार्यालयात बैठक घेतली. या नियुक्तीबाबत आपल्यावर अन्याय झाल्याचे मत दळी यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. याबाबत आमदार प्रसाद लाड यांना विचारले असता, ते म्हणाले, चवंडे यांची तालुकाध्यक्षपदी केलेली नियुक्ती योग्य आहे. पक्ष कोणाच्या घरचा नाही. वाटेल तेव्हा आणि मनाला येईल, तसे होत नाही. ज्याचे काम दिसते, त्याचा पक्ष सन्मान करतो, म्हणत लाड यानी ऍड. पटवर्धन यांची पाठराखण केली. 

कणकवलीत महायुतीचाच उमेदवार विजयी 

विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली (सिंधुदुर्ग) मतदार संघामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार नितेश राणे आहेत. तेथे शिवसेनेने देखील सतिश सवांत यांना अधिकृत उमेदवारी दिल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत बोलताना भाजपचे संपर्कप्रमुख आमदार प्रसाद लाड यांनी सावध भूमिका घेतली ते म्हणाले, तेथे महायुतीचाच उमेदवार विजयी होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Prasad Lad Comments on Bal Mane