Vidhan Sabha 2019 : राजापूर काँग्रेसकडेच, रत्नागिरी राष्ट्रवादीकडे 

सकाळ वृत्तसेवा | Sunday, 29 September 2019

रत्नागिरी - राजापूरची जागा काँग्रेसला व रत्नागिरीची राष्ट्रवादीकडेच राहील, यावर नुकतेच शिक्‍कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेले काही दिवस हे दोन्ही मतदारसंघ अदलाबदली करण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. रत्नागिरीतून राष्ट्रवादीकडून सुदेश मयेकर यांना हिरवा कंदील मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ते 3 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी निश्‍चित झाली आहे. कोणत्या जागा कुणी लढवायच्या, याबाबत वरिष्ठपातळीवर चर्चा सुरू आहेत. कॉंग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून राजापूरची ओळख आहे. तो राष्ट्रवादीला देऊन तेथून अजित यशवंतराव यांना उमेदवारी देण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याबाबत विचार होता. दोन्ही पक्षांचे पारंपरिक मतदारसंघ असल्याने त्यात बदल न करण्याचा निर्णय झाला आहे. तशा सूचना वरिष्ठस्तरावरुन दोन्ही विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत.

आघाडीच्या उमेवारांची यादी सोमवारी (ता. 30) जाहीर होण्याची शक्‍यता आहे. परंतु रत्नागिरीतून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. एबी फॉर्मही पाठविण्यात येणार असून मयेकर यांना वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे रत्नागिरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांच्या विरोधात मयेकर यांना लढा द्यावा लागणार आहे. 

लाड आणि यशवंतरावांमध्ये चुरस 
राजापूरच्या उमेदवारीबाबत अद्यापही अनिश्‍चितता आहे. अविनाश लाड यांचे नाव जोरदार चर्चेत होते. अजित यशवंतराव यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली जावी, यासाठी फिल्डींगही लावण्यात आली. काहींनी तर यशवंतराव यांनाच उमेदवारी मिळणार, असा दावाही केला आहे. कॉंग्रेसकडून उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये सस्पेन्स असला तरीही लाड यांच्या पारड्यात वजन पडण्याची दाट शक्‍यता आहे.