Vidhan Sabha 2019 : राणे - सावंत यांच्यात थेट लढत 

Vidhan Sabha 2019 : राणे - सावंत यांच्यात थेट लढत 

ओरोस - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात आज एकूण चौघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता तीन जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. कणकवलीत भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी माघार घेत शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे तेथे दुरंगी लढत होणार आहे.

कुडाळमधून नारायण राणेंचे पाठबळ जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांना मिळणार आहे. सावंतवाडीतील भाजपचे बंडखोर उमेदवार राजन तेली यांनाही राणे समर्थकांचे बळ मिळणार असल्याने तेथेही चुरस पाहायला मिळत आहे. आता कणकवली-कुडाळमध्ये दुरंगी तर सावंतवाडीत तिरंगी लढती निश्‍चित झाल्या आहेत. 

येत्या तारीख 21 रोजी मतदान आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांना आपले अर्ज मागे घेण्याची तारीख आज होती. या दिवशी जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातून चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यात कणकवलीतून संदेश पारकर, कुडाळमधून अतुल काळसेकर, विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर, तर सावंतवाडी मतदारसंघातून समाधान जयराम बांदवलकर यांचा यात समावेश आहे. परिणामी जिल्ह्यातील तीन विधानसभेसाठी एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वाधिक सावंतवाडी मतदारसंघात नऊ तर कुडाळ व कणकवली मतदारसंघात प्रत्येकी सात उमेदवार रिंगणात आहेत. 

याबाबतची प्रशासकीयस्तरावरील माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड, निवडणूक नायब तहसीलदार दत्ताराम परब, जिल्हा माहिती अधिकारी संजय ओरके, जिल्हा माहिती सहायक हेमंत चव्हाण उपस्थित होते. 

यावेळी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, ""सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर (शिवसेना), प्रकाश रेडकर (मनसे), सुधाकर माणगावकर (बसपा), प्रेमानंद लक्ष्मण साळगावकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) हे नोंदणीकृत चिन्ह असलेल्या पक्षांचे उमेदवार आहेत. दादू ऊर्फ राजू कदम (बहुजनमुक्ती), यशवंत पेडणेकर (बहुजन महामोर्चा), सत्यवान उत्तम जाधव (वंचित बहुजन आघाडी) हे नोंदणीकृत पण निवडणूक आयोगाचे चिन्ह न मिळालेले उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून राजन कृष्णा तेली, अजिंक्‍य धोंडू गावडे हे दोन उमेदवार आहेत.'' 

कुडाळ मतदारसंघात चेतन मोंडकर (राष्ट्रीय कॉंग्रेस), रवींद्र कसालकर (बसपा), धीरज परब (मनसे), वैभव नाईक (शिवसेना) अधिकृत चिन्ह असलेले, तर बाळकृष्ण जाधव, रणजित देसाई व सिद्धेश पाटकर हे तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. 

कणकवलीमधून नितेश राणे (भाजप), राजन दाभोलकर (मनसे), विजय साळकर (बसपा), सतीश सावंत (शिवसेना), सुशील राणे (राष्ट्रीय कॉंग्रेस) हे पाच उमेदवार नोंदणीकृत चिन्ह असलेले तर मनाली वंजारे (वंचित बहुजन आघाडी), वसंतराव भोसले (बहुजनमुक्ती पार्टी) हे दोन उमेदवार नोंदणीकृत चिन्ह नसलेले आहेत, अशी माहिती यावेळी डॉ. पांढरपट्टे यांनी दिली. 

दृष्टिक्षेपात 

  • सावंतवाडीत राणे समर्थक पदाधिकारी राजन तेलींच्या प्रचारात 
  • सावंतवाडीत दीपक केसरकर, राजन तेली, बबन साळगावकर अशी तिरंगी लढत 
  • कुडाळात दत्ता सामंतांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर राणेंचे बळ रणजित देसाई यांच्या पाठीशी 
  • कुडाळमध्ये भाजपच्या अतुल काळसेकर, बाबा मोंडकर यांचे अर्ज मागे 
  • कणकवलीत नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत लढत 
  • शिवसेनेवर टीका न करण्याचे नितेश राणेंचे धोरण 
  • नारायण राणेंवरील टीका सहन न करण्याचा इशारा 
  • भाजपविरोधात नव्हे तर राणेंविरोधात लढत असल्याचा शिवसेनेच्या विनायक राऊत यांचा दावा 
  • सावंतवाडीमधून लढणारे राजन तेली तसेच कुडाळमधून लढणारे रणजित देसाई यांना "कपाट' हे चिन्ह 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com