रत्नागिरीत अकरावाजेपर्यंत 23.36 टक्के मतदान

voting in Devrukh
voting in Devrukh

रत्नागिरी - जिल्ह्यात 11 वाजेपर्यन्त 23.36 टक्के मतदान झाले होते. दापोली मतदारसंघात 23.85 टक्के, गुहागरमध्ये 21.64 टक्के, चिपळूणमध्ये 23.32 टक्के, रत्नागिरीमध्ये 22.67 टक्के तर राजापूरमध्ये 25.4 टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात 11 वाजेपर्यन्त 3 लाख 6 हजार 178 लोकांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. 

दरम्यान,  विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत ३२ उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (ता. २१) मतदान यंत्रात बंद होणार आहे. जिल्ह्यातील १३ लाख ११ हजार ३९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. 

सोमवारी (ता. २१) सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरवात होत आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा हक्‍क बाजावता येईल. जिल्ह्यातील पाच मतदारसंघात एकूण १७०३ मतदान केंद्रे असून ६ लाख २८ हजार ६१३ पुरुष आणि ६,८२,७७४ स्त्री तर १० इतर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान केंद्रावर ११ हजार ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून १७३ केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आली आहेत. 

जिल्ह्यात १०१ जोखीमग्रस्त मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील १४२ केंद्रांवर मायक्रो निरीक्षकांची नियुक्ती केली आहेत. मशिन बंद पडल्यास जादा मशिन ठिकठिकाणी ठेवली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com