Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 144 कलम लागू

Sindhudurg Collector office
Sindhudurg Collector office

सिंधुदुर्गनगरी - विधानसभा निवडणूकीसाठी उद्या (ता.21) मतदान तर 24 ला मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून ही निवडणूक प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्‍यक असल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी 144 कलम लागू केले आहे.

निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पुर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊड स्पिकरचा वापर सकाळी 6 ते रात्री 10 वाजल्यानंतर करता येणार किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या वेळेपासून 48 तास अगोदर लाऊड स्पिकरचा वापर करता येणार नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदान दिवशी कोणत्याही उमेदवारास निवडणूक प्रचार बूथची उभारणी करता येणार नाही.

कोणत्याही उमेदवारास निवडणूक प्रचारच्या अनुषंगाने मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करणेत आलेल्या ठिकाणाचे जवळ किंवा धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्थांसारख्या सार्वजनिक ठिकाणाचे जवळ तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदानादिवशी मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करणेत आलेल्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रापासून 100 मिटरचे परीसरात कोणाही व्यक्तिला पुढील कृत्ये करता येणार नाहीत.

कोणत्याही स्वरुपात निवडणूक विषयक प्रचार करणे. मतदारांना धमकविणे. मतदारावर ठाराविक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव टाकणे. मतदाराचा मतदानाचा हक्क बजावू नये यासाठी कोणत्याही मार्गाने दबाव टाकणे. उमेदवाराचे चिन्ह दर्शविणारे नोटीस बोर्ड प्रदर्शित करणे. मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट किंवा तत्सम अन्य इलेक्‍टॉनिक साहित्याचा वापर करणे तसेच मतदान केंद्रामध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश करणे.

राज्याची अगर देशाची सुरक्षितता धोक्‍यात येईल अगर आदर्श आचारसंहिता भंग होईल, अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे / चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करता येत नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील तरतुदींचा भंग होईल अशाप्रकारे कोणत्याही निवडणूक प्रचाराविषयक साहित्याची छपाई करता येणार नाही.

शस्त्र अधिनियमाच्या तरतुदीखाली अधिकृत हत्यार परवानाधारण केलेल्या परवाना धारकांना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्रात आपली हत्यारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणेस तसेच जवळ बाळण्यास मनाई करण्यात येत आहे. विशिष्ट परिस्थितीत संबंधित पोलीस निरीक्षक यांचे पूर्वपरवानगीने (खाजगी सुरक्षा वगळून) नॅशनलाईज्ड बॅंका, सहकारी तत्वावरील बॅंका, महत्वाची धार्मिक स्थळे, रायफल क्‍लब व त्यांचे अधिकृत मेंबर, औद्योगि युनिट, पब्लिक एंटरप्राईजेस यांना अशी हत्यारे व दारुगोळा वाहतूक करता येइल. तथापी सदरच्या आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकिय कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही, असे यात श्री. पांढरपट्टे यांनी म्हटले आहे.

मोटारगाड्या वाहनेही कोणत्याही परिस्थितीत तीन पेक्षा अधिक वाहनाच्या ताफ्यात चालविण्यात येवू नयेत; मात्र हा आदेश सर्व मोठ्या संरक्षक गाड्यांच्या ताफ्यात तो केंद्र किंवा राज्य शासनाने किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तिस घेवून जात असेल आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना झेडप्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असेल तेव्हा त्यांचया सुरक्षितते विषयी वापरया जाणाऱ्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.
कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या विधानसभा मतदार संघात मतदार म्हणून नोंद नसलेल्या व मतदानाचा हक्क बजाविणेस पात्र नसलेल्या राजकिय पक्षप्रमुख व राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांना मतदान प्रक्रिया पूर्ण होणाऱ्या वेळेपासून 48 तासापूर्वी सदर मतदारसंघात वास्तव करता येणार नाही. जिल्ह्यामध्ये हा आदेश 17 पासून 25 ऑक्‍टोबर पर्यंत लागू राहिल, असे डॉ. पांढरपट्टे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com