Vidhan Sabha 2019 : शिवसेना पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्षांची मागणी 

Vidhan Sabha 2019 : शिवसेना पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्षांची मागणी 

कणकवली - निवडणूक प्रचाराला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना आपल्याच कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडणे, दहशत निर्माण करणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे पोलिस यंत्रणेने सजग व्हावे आणि शिवसेनेच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली. दहशतवादाचे खरे सूत्रधार हे सतीश सावंत हेच आहेत, असाही आरोप त्यांनी केला. 

येथील भाजप कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर उपस्थित होते. श्री. जठार म्हणाले, ""राणेंनी आजपर्यंत ज्या निवडणूका लढल्या त्या निवडणुकांची गणिते सतीश सावंत यांना पाठ आहेत. किंबहूना निवडणुकीत होणाऱ्या दहशतीच्या प्रकारांचे खरे सूत्रधार हे सतीश सावंत हेच आहेत. त्यामुळे या निवडणुकांतही तसे प्रकार होण्याची शक्‍यता आहे. एवढेच नव्हे तर या सर्व घटनांमध्ये कणकवली मतदारसंघातील उमेदवार नीतेश राणे यांना बदनाम केले जाऊ शकते. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मंडळींना पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन केली आहे.'' 

श्री. जठार म्हणाले, ""संचयनी घोटाळा आणि ठेकेदार लॉबीशी असलेले संबंध यामुळे सतीश सावंत यांच्याकडे करोडोची माया जमा झाली आहे. यातूनच त्यांची आमदारकीची स्वप्न पडू लागली. आमदारकीची महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी सतीश सावंत हे कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिस यंत्रणेने सजग व्हायला हवे.'' 

उद्धव ठाकरे म्हणाले, सावंतवाडीचा राजवाडा पाहण्यासाठी पुन्हा येणार  

शिवसेनेला भांडणातच रस 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राणेंना भाजपमध्ये घेतले. तसेच कणकवलीची एकमेव जागा देऊन शिवसेनेचीही मर्जी राखली. त्यामुळे कणकवली मतदार संघात शिवसेनेने आपला उमेदवार उभा करण्याची आवश्‍यकता नव्हती; परंतु शिवसेनेला भांडणात अधिक रस आहे. कोकणच्या विकासापेक्षा कोकण भकास होण्याचीच शिवसेना वाट बघत आहे असे श्री.जठार म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com