Vidhan Sabha 2019 : तिन्ही प्रमुख उमेदवारांनी सावंतवाडीत ठोकला तळ

Deepak Kesarkar, Baban Salgaonkar, Rajan Teli done voting
Deepak Kesarkar, Baban Salgaonkar, Rajan Teli done voting

सावंतवाडी - सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील लढती व प्रत्येकांनी आपल्या विजयासाठी लावलेली ताकद लक्षात घेता शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली व राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी सळापासुनच शहरात तळ ठोकून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्याच्या गाठीभेटीवर भर दिला. दुपारनंतर इतर तालुक्‍यात त्यांनी अहवाल घेतला. एकुणच शहरात मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता दिसुन आली.

श्री. केसरकर यांनी चितारआळी तालुकास्कुल तर बबन साळगावकर यांनी वि. स खांडेकर हायस्कुल भटवाडी येथील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
सावंतवाडी तालुक्‍यात विधानसभा मतदानाकरता प्रशासन सज्ज असतांना तालुक्‍यातील शहर व ग्रामीण भागात पोलिसांची यंत्रणा सक्षम दिसुन आली. प्रत्येक केंद्रावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते, अशी शक्‍यता बाळगून संबधित मतदान केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. यामध्ये कोलगाव, तळवडे व शहरातील काही भागात ही स्थिती दिसुन आली. तर काही ठिकाणी एकाच जागेवर दोन किंवा तीन बुथ आल्याने तेथेही गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त जादा ठेवण्यात आला होता.

एकुणच सकाळीच मतदान करण्यासाठी मतदार बाहेर पडल्याचे दिसुन आले. वृद्ध महीलाही उत्स्फूर्तपणे स्वतः मतदान करण्यासाठी हजेरी लावत होत्या. तालुक्‍यातील कोलगाव, चराठा, कारीवडे, तळवडे, इन्सुली, माडखोल, कोलगाव, कारीवडे, कुणकेरी, सांगेली, वेत्ये तर शहरातील बाहेरचावाडा, भटवाडी, सालईवाडा, आदी मतदान केंद्रावर सकाळीच काहीशी गर्दी होती. 

सावंतवाडी विधान सभा मतदार संघात शिवसेनेचे दीपक केसरकर, राष्ट्रवादीकडून बबन साळगावकर, भाजपकडून पुरस्कृत अपक्ष राजन तेली, मनसेकडून प्रकाश खेडकर, वंचित आघाडीचे सत्यवान जाधव, बहुजन मुक्ती पार्टीचे राजू कदम, बहुजन महा पार्टीचे सुनिल पेडणेकर, बसपा कडून तर अपक्ष अजिंक्‍य गावडे आदी नऊ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत; मात्र ग्रामीण भागात केसरकर व तेली समर्थकांचे बुथ प्रत्येक ठिकाणी दिसुन येत होते तर शहरात राष्ट्रवादीचे उमेदवार साळगावकर यांचे बुथ ठिकठिकाणी दिसुन येत होते. एकुणच ग्रामीण भागात लोकांचा उत्साह दिसुन आला.

शिवसेना उमेदवार पालकमंत्री केसरकर, राष्ट्रवादीचे उमेदवार साळगावकर व भाजप पुरस्कृत उमेदवार तेली हे मतदार संघात तळ ठोकून होते. तर सावंतवाडी शहरात सकाळ पासुन तिन्ही उमेदवारांनी बुथवर जाऊन कार्यकर्त्याची भेटीगाठी घेण्यावर भर दिला होता. कुठेच मतदान यंत्रात बिघाड किंवा कार्यकत्यामध्ये बाचाबाची दिसुन आली नाही. अंध अपंग, वृद्ध मतदारासाठी मतदान कर्मचार्याकडूच चांगले सहकार्य दिसुन आले. सगळीकडे दुपारपर्यंत शांततेत मतदान सुरु होते.

""माझ्या पराभवासाठी बलाढ्य शक्ती एकवटली आहे. यामध्ये जिल्ह्यातील भाजपसह नारायण राणे, शरद पवार आदींचा समावेश आहे; मात्र या आद्यशक्तीला मला मानणारी जनशक्ती त्यांना पराभवाची धूळ चालेल. 
- दीपक केसरकर,
शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री.

""सत्ता आणि सत्तांतर करणे हे मतदारांच्या हातात असल्याने ते नक्कीच पर्यटन, रोजगार, आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतील. त्यामुळे परिवर्तन दिसून येईल.''
- बबन साळगावकर,
राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com