Vidhan Sabha 2019 : विराट शक्तीप्रदर्शनात सामंताचा अर्ज दाखल 

Vidhan Sabha 2019 : विराट शक्तीप्रदर्शनात सामंताचा अर्ज दाखल 

रत्नागिरी - विराट शक्तीप्रदर्शन करीत शिवसेना भाजप, रिपाई महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विवेक हॉटेल येथे मेळावा झाल्यानंतर भव्य रॅलीने ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सुमारे 12 ते 15 हजार लोकांच्या साक्षीने अर्ज भरण्याचा उदय सामंत यांनी नवा विक्रम केल्याचा दावा सेनेकडून केला जात आहे. 

हॉटेल विवेकच्या प्रांगणात महायुतीचा मेळावा झाला. महायुतीचा बॅनर, झेंडे आदीमुळे वातावरण भगवेमय झाले होते. मेळाव्यात येण्यापूर्वी युतीची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर युतीचे पदाधिकारी व्यासपीठावर आले.कार्यकर्ते वाढल्याने रिकाम्या जागेतही खुर्च्या लावल्या होत्या. कार्यकर्त्यांची मरगळ झटकून उत्साह आणण्यासाठी उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दोन सेलिब्रेटींची भेट दिली. खासदार विनायक राऊत, महायुतीचे उमेदवार उदय सामंत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हा प्रमुख विलास चालके, अण्णा सामंत, माजी मंत्री रवींद्र माने, गणपत कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, अशोक मयेकर उपस्थित होते. 

महायुतीची गर्दी अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. आधीच वेळ झाल्यामुळे उदय सामंत आणि खासदरा राऊत यांनी आपली छोटेखानी भाषणे करून अर्ज भरण्यासाठी रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. संपूर्ण रस्ता भरून युतीचे कार्यकर्ते अर्ज भरण्यासाठी निघाले सामंत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले तरी रांग मैदानापर्यंत होतीच,असे भव्य शक्तीप्रदर्शन महायुतीने केले. कोण आला रे कोण आला,शिवसेनेचे वाघ आला, अब की बार एक लाख पार, आमचे ठरलयं, अशा गगनभेती घोषणा देत सामंत यांनी अर्ज दाखल केला. 

स्वतःला उमेदवार समजून काम करा - सामंत 
महायुतीची कोकणातील ही विक्रमी गर्दी संगते माझा विजय निश्‍चित आहे. आपण स्वतः उमेदवार आहे, असे समजुन प्रत्येकाने काम करा आणि पुन्हा मला चौथ्यांदा निवडुन द्या. महायुतीच्या या उमेदवाराच्या पारड्यात मते टाका आणि मला विधानसभेत पाठवा,असे आवाहन युतीचे उमेदवार उदय सामंत यांनी विराट मेळाव्यात केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com