Vidhan Sabha 2019 : दापोलीतून शिवसेनेकडून योगेश कदम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

दाभोळ - दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार म्हणून योगेश रामदास कदम यांची उमेदवारी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केली असून यामुळे दापोलीतील शिवसेनेच्या उमेदवाराविषयीचा संभ्रम दूर झाला आहे.

दापोली विधानसभा मतदार संघावर शिवसेना व भाजप या दोघांनीही दावा केला होता, तर शिवसेनेतून योगेश कदम, संदीप राजपुरे व सुनील भागणे हे तीन जण इच्छुक होते .या तिघांनीही उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखतही दिली होती. कुणबी समाजाच्या वतीनेही कुणबी उमेदवार द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आज प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दापोली विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून योगेश कदम यांच्या नावाची घोषणा केली आहे. आज योगेश कदम यांना शिवसेनेच्या वतीने ए बी फॉर्मही देण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Yogesh Kadam From Shivsena in Dapoli