Vidhan Sabha 2019 : चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघात बसपाची उमेदवारी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

रत्नागिरी - चिपळूण - संगमेश्वर विधानसभेसाठी बहुजन समाज पार्टीकडून सचिन मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे पक्षाचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी सांगितले. मोहिते यांच्या उमेदवारीला बहुजन समाजाकडून पाठिंबा मिळत असून बौद्ध समाजाच्या युवा वर्गाने या उमेदवारीचे स्वागत केले आहे. 

यासंदर्भात आयरे म्हणाले, गेली 22 वर्ष सतत समाजात राहून अनेक प्रश्न त्यांनी सोडविले आहे. त्यामुळे समाजात त्यांच्याप्रती आदराचे स्थान आहे. चळवळीचे काम करत असताना त्यांना अनेक राजकीय पक्षांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही स्वकीय पण त्यांना अनेकदा भेटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गद्दारी करणार नाही, असा त्यांचा स्वाभिमानी बाणा आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार नसला की अनेकजण आपल्या नेत्याला अंधारात ठेऊन अन्य जातीयवादी पक्षाचा प्रचार करताना समाजाने पाहिले. सचिन मोहिते यांनी कधीही पाय चळवळीच्या बाहेर पडू दिला नाही. मोहिते यांनी या चळवळीसाठी मोठा त्याग केला आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीची चर्चा झाली आणि बौद्ध तरुणांनी त्यांना भेटून लढण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक बौद्ध युवक मंडळांनी पाठिंबा दिला आहे. एका राष्ट्रीय पक्षाकडून निवडणूक लढण्याची संधी मिळत असेल तर आपण लढविली पाहिजे, असा युवांचा सूर येत आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष अडचण होऊ शकतो. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Chiplun Assembly Constituency BSP Declares Candidate