Vidhansabha2019 : गुहागरमध्ये युतीकडून 'यांच्या' उमेदवारीवर शिक्कामोर्तब  

Vidhansabha2019 : गुहागरमध्ये युतीकडून 'यांच्या' उमेदवारीवर शिक्कामोर्तब  

गुहागर - महाराष्ट्राला आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. कोकणात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने गुहागरची जागा कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. नुकत्याच झालेल्या भाजपच्या मुंबईतील बैठकीत गुहागरची जागा भाजपलाच मिळणार आणि ती डॉ. विनय नातूच लढविणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या नावाची अधिकृत घोषणा मात्र अजूनही झालेली नाही. 

गुहागर विधानसभा मतदारसंघ पूर्वी भाजपचा गड मानला जात असे. 2009 मध्ये युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडून रामदास कदम यांनी लढविली. डॉ. नातूंनी बंडखोरी केली. त्याचा फायदा शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले आणि विधान परिषदेचे आमदार असलेले भास्कर जाधव यांना झाला. त्यानंतर 2014 मध्ये विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढविली. आमदार भास्कर जाधव यांनी आपला गड शाबूत राखताना दोन्ही पक्षांहून अधिक मते मिळवली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने युती म्हणूनच विधानसभा लढविण्याची घोषणा केली. तेव्हापासून गुहागर विधानसभेची जागा कोणाला मिळणार याबाबतची चर्चा मतदारसंघात सुरू होती. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख सचिन कदम, जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांच्या नावाची चर्चा होती. भाजपकडून विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड हेच आमदार भास्कर जाधव यांना टक्कर देऊ शकतात. कदाचित, नव्याने प्रवेश केलेल्यांना उमेदवारी मिळू शकते. अशा अनेक नावांच्या चर्चा होत्या. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. डॉ. विनय नातूंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रदेश भाजपकडून लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. 

""उमेदवारी मिळाली, तर डॉ. विनय नातूंना कोणत्याही परिस्थिती आम्ही निवडून आणणारच, असा निश्‍चय भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.'' 
- नीलेश सुर्वे,
तालुका भाजप सरचिटणीस  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com