Vidhan Sabha 2019 : कणकवलीत काँग्रेसमधून 'हे' संभाव्य उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

कणकवली - विधानसभा निवडणुकीची तारीख अगदी जवळ आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीबरोबर काँग्रेस आघाडीनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असून याखेपेस माजी आमदार अमृतराव राणे यांचे चिरंजीव सुशील राणे यांना काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. नारायण उपरकर हेही संभाव्य उमेदवार आहेत.

कणकवली - विधानसभा निवडणुकीची तारीख अगदी जवळ आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीबरोबर काँग्रेस आघाडीनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असून याखेपेस माजी आमदार अमृतराव राणे यांचे चिरंजीव सुशील राणे यांना काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. नारायण उपरकर हेही संभाव्य उमेदवार आहेत.

देशात व राज्यात काँग्रेस आणि घटकपक्ष राजकीय अडचणीला सामोरे जात आहेत. यातून उभारी देण्यासाठी काँग्रेसने तरुण नेतृत्वाला संधी देण्याबाबत विचार सुरू केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून कोण उमेदवार असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. त्यातच खासदार नारायण राणे व त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पत्र भाजप विलीनीकरणाच्या तयारीत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून अजून कुणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यमान आमदार नीतेश राणे हे कोणत्या तिकिटावर लढणार, हे स्पष्ट झालेले नाही. 

काँग्रेसला त्यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे. साहाजिकच काँग्रेसला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. काँग्रेस पक्षाकडे या विधानसभा मतदारसंघात तीनही तालुक्‍यांत स्थानिक सक्षम उमेदवार फारसे नाहीत. 

त्यामुळे राणे यांचे एकेकाळचे सहकारी नारायण उपरकर यांच्या नावाची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. उपरकर यांनी १९९९ मध्ये देवगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आप्पा गोगटे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढा दिला होता. त्यांना १३ हजार ६६९ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे बाळू कुबल यांना १० हजार ६०१ मते मिळाली होती; पण श्री. गोगटे हे २३ हजार २६८ मतांनी विजयी झाले होते. 

याचबरोबर देवगड येथील अमृतराव राणे यांनी १९८० मध्ये देवगड विधानसभा मतदारसंघात १६ हजार ४२३ मतांनी विजय मिळविला होता. ते आय काँग्रेसचे होते. तर काँग्रेस (आय) मधून राजाभाऊ मिराशी हे उमेदवार होते. त्यांना १२ हजार १४ मते मिळाली होती. आता अमृतराव राणे यांचे चिरंजीव सुशील राणे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. 

गणेशोत्सव काळात त्यांनी कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. सुशील यांचे प्राथमिक शिक्षण खारेपाटण येथे झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी त्यांना राजकीय बळ दिल्यास सुनील राणे हे विद्यमान परिस्थितीमध्ये चांगली लढत देण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Kankavali Assembly Constituency