कुणबी समाज विधानसभेची 'ही' जागा लढवणार 

कुणबी समाज विधानसभेची 'ही' जागा लढवणार 

दाभोळ - दापोली विधानसभेची जागा कुणबी समाज लढवणार असल्याचे निश्‍चित झाले असून पुढील रणनीती व आमच्या निकषात बसत असलेल्या इच्छुक उमेदवारांबरोबर चर्चा करून उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा स्वाभिमानी बहुजन संघटनेचे अध्यक्ष गजानन पडियार व कुणबी समाजोन्नती संघ शाखा, दापोलीचे अध्यक्ष रमेश पांगत यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी कुणबी समाजोन्नती संघाची राजकीय समिती निश्‍चित केली असून या समितीमार्फत कोकणातील पाचही जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरू आहे. दापोली विधानसभेसाठी पाच इच्छुकांची नावे प्राप्त झाली असून अजूनही अनेकजण इच्छुक आहेत. विविध राजकीय पक्षांमध्ये कुणबी समाजाचे पदाधिकारी असून ते कुणबी समाजाचा उमेदवार त्या पक्षाकडून उभा व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. 

नुकत्याच झालेल्या नवभारत छात्रालय येथील बैठकीत दापोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे निश्‍चित केले आहे. आम्हाला कोणत्याच राजकीय पक्षाकडून आजवर विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यावेळी आम्ही समाज म्हणून एकत्र येऊन निवडणूक लढवणार, पुढील माहिती गणेशोत्सवानंतर देण्यात येईल

- रमेश पांगत  

स्वाभिमानचे शशिकांत धाडवे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत सुमारे 19 हजार मते घेतली होती. धाडवे यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र यावेळी कुणबी समाजाने निर्धार केला असून यामध्ये आम्हाला यश येईल, असा विश्‍वास पडियार यांनी व्यक्‍त केला.

यावेळी रमेश पांगत, रवींद्र घडवले, मंगेश वारसे, डॉ. सुनील गोरीवले, चंद्रकांत मोहिते, प्रभाकर लाले, नरेंद्र आग्रे, अनिल शिंदे, संदेश टेमकर उपस्थित होते. 

पंचवीस वर्षे गीते खासदार, तरीही साचलेपण 
लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या पराभवाच्या प्रश्‍नावर बोलताना पडियार म्हणाले, पंचवीस वर्षे गीते खासदार होते. त्यामुळे साचलेपण होते. त्यामुळे पराभव झाला मात्र आम्ही समाज म्हणून त्यांनाच पाठिंबा दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com