Vidhan Sabha 2019 : चिपळूणमध्ये 'या' उद्योजकाचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

चिपळूण - उद्योजक नासीर खोत यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एमआयएमने वंचित आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यामुळे खोत यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

चिपळूण - उद्योजक नासीर खोत यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एमआयएमने वंचित आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यामुळे खोत यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

ते म्हणाले, ""मी विधानसभेची निवडणूक लढवावी ही माझ्या हितचिंतकांची इच्छा होती. मी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होतो. मी निवडणुकीची चाचपणी करत असताना वंचित बहुजन आघाडी माझ्यासमोर एक उत्तम पर्याय होता. त्या पद्धतीने मी प्रयत्न चालू केले होते. वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मी चिपळूण, संगमेश्वर आणि देवरुखमध्ये प्रचार सुरू केला होता. परंतु एमआयएम व भारिप यांच्यात जागा वाटपावरून फूट पडली. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

निवडणुकीसाठी उरलेला कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे मी माझे मार्गदर्शक व हितचिंतक यांच्याशी चर्चा केल्यावर निवडणूक न लढवण्याचा निर्णय झाला आहे. ज्या लोकांपर्यंत मी गेलो त्यांनी सहकार्य करण्याचा शब्द दिला. माझ्यावर विश्वास ठेवला. त्या सर्वांचा मी आभारी आहे. माझे समाजकार्य हे अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी योग्य तो निर्णय आपल्या सर्वांचा विचार करून घेईन, असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Nasir Khot Setback from Chiplun Assembly Constituency