कोकण विभागीय मंडळावर विजय पाटकर यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

मालवण - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांची कोकण विभागीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई या संस्थेच्या वतीने भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तर वडाचापाट येथे श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल चालविण्यात येते. अलिकडे या संस्थेचे स्कूल कमिटीचे चेअरमन असणाऱ्या विजय पाटकर यांची या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षात श्री. पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीत मोलाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने सर्व विभागीय मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासन करत असते. कोकण विभागीय मंडळात मुख्याध्यापक, प्राचार्य (कनिष्ठ महाविद्यालय), शिक्षक (कनिष्ठ महाविद्यालय), शिक्षक (माध्यमिक विभाग) आणि व्यवस्थापन समिती (माध्यमिक विभाग) अशा संवर्गातील रिक्त सदस्यांच्या पदांच्या जागा भरल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवस्थापन समिती माध्यमिक विभागातून विजय पाटकर यांची तर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक प्रतिनिधी म्हणून रामेश्वर माध्यमिक विद्यालय आचरेचे शिक्षक प्रवीण खोपरे यांची नियुक्ती केली आहे. पाटकर यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Patkar is elected to Konkan Divisional Board