साहित्यिक विजय सातपुते यांच्या चौथ्या स्मृतिदिनी अवयवदान प्रबोधन

अमित गवळे
रविवार, 22 जुलै 2018

एक मनस्वी कार्यकर्ता, विद्रोही लेखक, कवी विजय सातपुते यांचे 20 जुलै 2014 रोजी निधन झाले. त्या वेळी त्यांच्या परिवाराने मरणोत्तर नेत्रदान करायचं ठरवलं.  विजय सातपुते मित्रपरिवार दरवर्षी विजय यांच्या स्मृतिदिनी वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्रे, व्याख्यान असे प्रबोधनात्मक उपक्रम करतात. यावेळी अवयवदान हा विषय निवडला होता.

पाली : विजय सातपुते चतुर्थ स्मृतिदिननिमित्त शुक्रवारी (ता.20) गोरेगाव-माणगाव येथे 'अवयवदान जनजागृती व्याख्यान' आयोजित केले होते.  विजय सातपुते मित्रपरिवार आणि रोटरी क्लब गोरेगाव यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.

एक मनस्वी कार्यकर्ता, विद्रोही लेखक, कवी विजय सातपुते यांचे 20 जुलै 2014 रोजी निधन झाले. त्या वेळी त्यांच्या परिवाराने मरणोत्तर नेत्रदान करायचं ठरवलं.  विजय सातपुते मित्रपरिवार दरवर्षी विजय यांच्या स्मृतिदिनी वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्रे, व्याख्यान असे प्रबोधनात्मक उपक्रम करतात. यावेळी अवयवदान हा विषय निवडला होता.

प्रास्ताविक करताना सिरत सातपुते यांनी या कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली. कोमसाप गोरेगाव चे अध्यक्ष मंदार म्हशेलकर यांनी विजय सातपुते यांची एक कविता सादर केली.  विजय सातपुते यांचे सहकारी अरुण जोशी यांचे पत्र यावेळी वाचून दाखवण्यात आले. आणखी एक सहकारी मित्र सागर तायडे यांनीही विजय सातपुतेंच्या आठवणी जाग्या केल्या. 

कार्यक्रमाला उपस्थित महाड येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ दाभाडकर यांनी विजय सातपुते यांच्या त्यावेळी झालेली नेत्रदानाबाबत आठवणी सांगत नेत्रदानाच्या सध्याच्या स्थितीवर प्रकाश टाकला. गोरेगाव चे सरपंच जुबेर अब्बासी यांनी विजय सातपुते यांच्याबाबतच्या स्थानिक राजकारणातील काही आठवणी सांगितल्या. रोटरी क्लब गोरेगाव चे अध्यक्ष विकास मेथा यांनी रोटरी क्लब च्या माध्यमातून होत असलेेल्या अवयवदान जनजागृतीच्या कामाबाबत माहिती दिली. तसेच सतीश शिर्के यांनी अवयवदानाबाबतचे अज्ञान व गैरसमज दूर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचा शेवट गोरेगाव चे सुपुत्र जेष्ठ अभिनेता पद्मश्री मनोज जोशी यांनी व्हीडिओच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी पाठवलेल्या संदेशाने झाला.  सुनील सहस्त्रबुद्धे यांनी सगळ्यांचे आभार मानले. याप्रसंगी गोरेगाव लोणेरे परिसरातील डॉक्टर, रोटरी क्लबचे सदस्य, कोमसापचे सदस्य होते. या ठिकाणी अवयवदाना बाबत माहितीचे पोस्टर लावण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ विनय कोपरकर यांनी अवयवदान या विषयावर मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी माहिती स्वतःच्या प्रेरणादायी उदाहरणासह दिली. अवयवदानाची सद्यस्थिती, असलेली मोठी गरज, जनजागृतीच्या प्रयत्नांची गरज, धार्मिक रूढी, अंधश्रद्धांमुळे या प्रसारात येणाऱ्या अडचणी याबाबत सखोल मांडणी केली. 3 वर्षांपूर्वी झालेल्या दुर्धर आजारात केवळ अवयवदानामुळे त्यांचा जीव वाचला म्हणून यापुढील आयुष्य केवळ अवयवदाना बाबत काम करायचे असा संकल्प त्यांनी केला आहे.
 

Web Title: vijay satpute death anniversary programme