गणपतीपुळे येथे विक्रोळीच्या पर्यटकाला वाचवण्यात यश

गणपतीपुळे येथे विक्रोळीच्या पर्यटकाला वाचवण्यात यश

रत्नागिरी - गणपतीपुळे समुद्रात बुडणा-या पर्यटकाला जीवरक्षकांना वाचवण्यात यश आले. विक्रोळी, मुंबई येथील चंद्रकांत भागवत असे या पर्यटकाचे नाव आहे.

चंद्रकांत आज गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आला होता..त्याला समुद्रात जाणाचा मोह आवरता आला नाही आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. किना-यावर असणा-या जीवरक्षकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तात्काळ चंद्रकांत यांना वाचवण्यासाठी.हालचाली सुरु केल्या. अखेर चंद्रकांत यांना वाचवण्यात यश आले. रोहित चव्हाण, अनिकेत मयेकर, उमेश म्हादये, ओंकार गावणकर. विशाल निंबरे, अनिकेत चव्हाण 
व प्रमोद डोर्लेकर या सर्वांनी मिळून त्याला सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com