दुःखावर पांघरुण घालणारे ‘पुल’ महानच - विक्रम गोखले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

रत्नागिरी - ‘ज्यांच्या नावाने हा सन्मान मिळालाय त्यांचा सहवास मला लाभला आहे. ‘पुलं’नी विनोदाने गुदगुल्या केल्या. ज्यांच्यावर विनोद केला त्यांनाही पुलंनी केलेला विनोद आवडायचा. दुःखावर पांघरुण घालणारे व प्रसंगी भवताल विसरायला लावणारे पु. ल. महानच होते. पुलोत्सव करणाऱ्या संस्थांना समाजाचे बळ मिळो,’ अशी प्रार्थना प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांनी केली.

आर्ट सर्कल व पुण्यातील आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सवाला सावरकर नाट्यगृहात सुरवात झाली. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते ‘पु.ल. स्मृती सन्मान’ पुरस्कार मिळाल्यावर गोखले बोलत होते. तत्पूर्वी पुलकित रेषा या पुलंवरील व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. सतीश आळेकर म्हणाले, ‘‘पुलंशी आमचे नाते संवेदनशील होते. पुल, विजय तेंडुलकर, चिं. त्र्यं. खानोलकर यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक नेतृत्व केले. 

पाच खंडांमध्ये पुलोत्सव
वीरेंद्र चित्राव म्हणाले, ‘‘पुण्यात ग्लोबल पुलोत्सव झाला. २००८ पासून रत्नागिरीमध्ये ‘पुलं’च्या सासुरवाडीत पुलोत्सव होत आहे. यंदा ‘पुलं’च्या शताब्दीनिमित्त पाच खंडांमध्ये ४२ ठिकाणी पुलोत्सव होणार आहे. ‘आय लव्ह पुलं’ आणि ‘पुलं’वर आधारित १६ कार्यक्रम सादर करणार आहे.’’

पुलंना कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी सादर करायला आवडायची. त्यामुळे त्यांची शब्दकळा सादरीकरणाला महत्त्व द्यायची. पुलं व कुसुमाग्रजांना सांस्कृतिक, सांस्कृतिक जाणीव महाराष्ट्रभर रुजणार असल्याचे आधीच कळले होते. ते द्रष्टे साहित्यिक होते. व्याकरणसिद्ध नसलेली कला म्हणजे नाटक. आपल्या अभिनय, अनुभवाने ही कला सिद्धीस नेण्याचे काम विक्रम गोखले यांनी केले आहे.’

चित्रकार चारुहास पंडित, नगराध्यक्ष राहुल पंडित, नाटककार अनिल दांडेकर यांनी लिहिलेलं सन्मानपत्र पूर्वा पेठे यांनी वाचून दाखवले. दीप्ती कानविंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Vikram Gokhale comment