शक्तिप्रदर्शनाने विक्रांत जाधवांचा अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

गुहागर - अंजनवेल जिल्हा परिषद गटातून आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुकाभरातून कार्यकर्ते आले होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली. गेल्या सात वर्षांपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी दिमाखात रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्याची परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसने जपली.

शृंगारतळी येथील ग्रामसचिवालयाच्या इमारतीतील कॉम्प्युटर सेंटरमध्ये सकाळी ११ वाजता विक्रांत जाधव यांनी ऑनलाइन अर्ज भरला. त्यानंतर गुहागरला तहसील कार्यालयात ऑनलाइन अर्ज भरल्याची स्लीप जमा केली. दरम्यान, विक्रांत जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व कार्यकर्ते शिवाजी चौक येथे जमले होते. तेथून रॅलीला प्रारंभ झाला. आमदार भास्कर जाधव यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. तहसीलदार कार्यालयात विक्रांत जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. यावेळी आमदार भास्कर जाधव, सौ. सुवर्णा जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

आजच्या दिवसभरात राष्ट्रवादीच्या वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. नेत्रा ठाकूर, पालशेत जिल्हा परिषद गटाचे उमदेवार प्रवीण ओक, पडवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रामचंद्र हुमणे गुरुजी, पंचायत समितीसाठी पडवे गणातून दिलबहार इबजी व खोडदे गणातून उमेश कदम, पालशेत गणातून पांडुरंग कापले, पाटपन्हाळे गणातून सुनील पवार हेदेखील उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, इंटरनेट स्पीड आणि शासनाच्या सर्व्हरचा स्पीड कमी असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात विघ्ने येत आहेत. 

‘‘तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्‍यक असणाऱ्या सुविधा शासनाने अजूनही पुरविलेल्या नाहीत. ग्रामीण भागातून इंटरनेट मिळत नाही. खुद्द शासनाच्या सर्व्हरचा स्पीड कमी आहे. तरीदेखील आपण डिजिटल क्रांती करतोय, हे दाखविण्याचा बालहट्ट शासन का करीत आहे हे कळत नाही.’’
 - आमदार भास्कर जाधव

Web Title: vikrant jadhav form submit