मोपापेक्षा चिपी विमानतळाला चांगला प्रतिसाद लाभेल - राऊत

प्रशांत हिंदळेकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

मालवण - चिपी विमानतळाचा परिसर हा आल्हाददायक असल्याने मोपापेक्षा याच विमानतळाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी तळगाव ता. मालवण येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

या विमानतळाच्या परिसरात देश, विदेशातून येणार्‍या पर्यटकांसाठी थ्रीस्टार, फोरस्टार हॉटेल्सची निर्मिती व्हायला हवी. ताज, ओबेरॉय यांना ज्या जागा दिल्या होत्या. त्यांच्याकडून अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांना अंतिम सूचना द्यावी किंवा त्या जागा ताब्यात घ्याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार असल्याचेही श्री. राऊत यांनी सांगितले.

चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर खासदार नारायण राणे यांनी विमानतळाच्या ठिकाणी घुसखोरी करत विमान लॅडिंग, टेकऑफ केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा असे मत व्यक्त केले होते. यावर बोलताना श्री. राऊत म्हणाले, विमान लॅडिंग व टेकऑफसाठी कोणत्या प्रक्रिया होतात याची माहिती राज्याचे मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या आणि शासकीय, मालकीच्या विमानातून प्रवास करणार्‍या नारायण राणेंसारख्या व्यक्तीला माहीत नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे. त्यांनी आपल्यावर व पालकमंत्र्यांवर खुशाल गुन्हे दाखल करून आपल्या अकलेचे तारे तोडावेत अशी टीकाही त्यांनी केली.

 चिपी येथील विमानतळ हे केंद्र, राज्य शासनाचे नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विमानतळावर घुसखोरी करत विमान लॅडिंग, टेकऑफ केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा असे राणेंनी म्हणणे हा त्यांचा वैचारीक दळभद्रीपणा आहे 

- विनायक राऊत, खासदार 

विमान लॅडिंग, टेकऑफसाठी आयआरबीने आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या. त्या खोट्या असतील तर विमानचालन विभागाच्या संचालकांनी कारवाई करायला हवी होती. या विमानतळ धावपट्टीच्या दर्जाची यापूर्वीच तपासणी झाली होती. मात्र प्रवासी वाहतूकीसाठीचा परवाना नसल्यानेच 12 सप्टेंबरला आलेल्या विमानातून विशेष महनीय व्यक्ती नव्हत्या. परवाना आणि चाचण्या तसेच परवाना आणि लॅडिंग याचा कोणताही संबंध नसल्याचे श्री. राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीचा परवाना मिळण्यासाठी विमानतळाकडे जाणार्‍या लगतच्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच रात्रीच्यावेळचे लॅडिंग असल्याने वीजपुरवठ्याची सुविधा आवश्यक आहे. याची कार्यवाही झाल्यानंतरच विमानतळास प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळेल. यादृष्टीने विमानतळाकडे जाणारा रस्ता पाच मीटर तसेच परुळे बाजारपेठेतील रस्ता सात मीटरचा केला जाणार आहे. सध्या विमानतळाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या विमानतळावर पाच विमाने उभी राहू शकतात. तसेच काही मिनीटांच्या अंतराने दोन विमाने उतरू शकतात अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी शिवसेना पदाधिकारी प्रसाद मोरजकर, गोपी पालव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
Web Title: Vinayak Raut Comment