नीतेश राणेंनी वडिलांकडून शिकवणी घ्यावी

नीतेश राणेंनी वडिलांकडून शिकवणी घ्यावी

सावंतवाडी - माझ्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे हा मूर्खपणा आहे. नीतेश राणे यांनी अशाप्रकारे विधान करण्यापेक्षा आपल्या वडिलांकडून शिकवणी घ्यावी, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी येथे केली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे माझे मित्र आहेत. त्यांनी खासदारकी लढवण्याबाबत जी इच्छा व्यक्त केली ती मी समजू शकतो. प्रत्येक माणसाला आपली इच्छा व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांच्याशी मी बोलेन, असेही त्यांनी सांगितले.
येथे आयोजित कार्यक्रमासाठी राऊत आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आंदोलन करून जिल्हाभरातील पोलिस ठाण्यात राऊत यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याचा इशारा आमदार राणे यांनी दिला होता. त्याला त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘ ज्या कामांना ऑर्डर मिळते अशाच कामांची आम्ही भूमिपूजन किंवा उद्‌घाटन केले. १०४ टॉवर मंजूर आहेत. करायची असती तर सर्वच उद्‌घाटने केली असती; परंतु ५०-५२ कामांची वाटणी केली आहे. त्याची वर्कऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे नीतेश राणे यांना मिळालेली माहिती चुकीची आहे.’’

खासदार राऊत म्हणाले, ‘‘आमदार राणे यांनी आपल्या वडिलांकडून राजकारण शिकून घ्यावे. माहिती घ्यावी. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी राणेंना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली नाही. १०४ टॉवरचे काम प्रगतीपथावर आहेच. याबाबत लवकरच आपण माहिती देऊ. त्यामुळे ते दिखाऊपणा करत आहेत. त्याच्याशी मला घेणे-देणे नाही. त्यांना वाटल्यास त्यांनी खुशाल गुन्हा दाखल करावा.’’

प्रमोद जठारांच्या इच्छते गैर काय?
प्रमोद जठार यांनी लोकसभा लढविण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘माणसाला स्वातंत्र्य आहे. प्रमोद जठार माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली, त्यात गैर काय?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com