जुहू बंगल्याच्या चौकशीमुळेच राणेंचे भाजपकडे लोटांगण

 जुहू बंगल्याच्या चौकशीमुळेच राणेंचे भाजपकडे लोटांगण

रत्नागिरी - जुहू येथील बंगल्याची चौकशी सुरू झाली तेव्हा नारायण राणे यांनी भाजपकडे लोटांगण घातले. १९२ कंपन्यांची चौकशी थांबवावी म्हणूनच तुम्ही भाजपच्या आश्रयाला गेलात. असा टोला शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी लगावला. 

खासदार नारायण राणे यांनी युती ही ईडीचा ससेमीरा टाळण्यासाठी केली असल्याचा आरोप केला होता यावर राऊत यांनी असे उत्तर दिले. 

शिवसेना-भाजपच्या युतीचे स्वागत करतो. आम्ही सर्व एकत्र येऊन मने जुळविण्याचा निर्णय घेऊन २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एनडीएचे शासन येईल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नीलेश राणे यांची अनामत जप्त होईल, असा ठाम विश्‍वासही खासदार राऊत यांनी व्यक्त केला. 

येथील संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी 
उपस्थित होते. 

गेल्या चार वर्षांमध्ये सेना-भाजप युतीमधील तणाव प्रचंड वाढला आहे. अनेक विकासकामांवरून श्रेयवाद झाले. 
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. स्वबळावर लढण्याची दोन्ही पक्षांनी तयारी केली आणि अचानक युती झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील सेना-भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मने एवढ्या लवकर जुळतील असे दिसत नाही, तरी दोन्ही पक्षांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केला आहे. लवकरच एकत्रित बैठक होणार आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे अशी थेट लढत होणार आहे. याबाबत त्यांना विचारले असता राऊत म्हणाले, युतीचे स्वागत केले आहे. आता नीलेश राणेंचे डिपॉझिट जप्त होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com