युतीने विरोधकांना आंदोलनाची संधीच दिली नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

नारळ फोडण्याचा अधिकार नीलेश राणेंना आहे का ? 
मुख्यमंत्री निधीतून झालेल्या कामांचा नारळ फोडण्याचा नीलेश राणे यांना अधिकार आहे का ? असा सवाल खास राऊत यांनी उपस्थित करीत ना तुम्ही आमदार, ना खासदार, ना सरपंच, ना सदस्य असा टोलाही लगावला.

कुडाळ - गेल्या दहा वर्षात विरोधकांना जे जमले नाही ते अवघ्या पाच वर्षात शिवसेना भाजप युतीने सिंधुदुर्गात विकासाची गंगा आणून दाखविली. वचन नव्हे तर स्वप्नपूर्तीचे काम युती जनतेसाठी करीत आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी एवढी विकासाची कामे केली की स्वाभिमानला उपोषण, मोर्चे करण्याची संधीच दिली नाही, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज पिंगुळी मांडकुली खोडदेश्‍वर पूल भूमीपुजन प्रसंगी केले.

आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून मांडकुली खोडदेश्वर येथे कर्ली नदीवर पूल मंजूर करण्यात आला आहे. नाबार्ड योजनेतून या पुलासाठी 4 कोटी 13 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाचे भूमिपूजन आज खासदार राऊत याच्या हस्ते आमदार नाईक, शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, अमरसेन सावंत, अतुल बंगे, राजन नाईक, सचिन काळप, महेंद्र वेंगुर्लेकर, ठेकेदार मूर्ती, संजय भोगटे, प्रभाकर राणे, जयभारत पालव, संदिप राऊळ, बाळा कोरगावकर, दीपक आगणे, गंगाराम सडवेलकर, संकेत धुरी, सहदेव धुरी, सुरेश पेडणेकर, अनामिका जाधव, बबन बोभाटे, विष्णू धुरी, सिद्धेश धुरी, भास्कर लाड, मांडकुली सरपंच तुषार सामंत, दिलीप निचम आदी उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, ""गेल्या पाच वर्षांमध्ये जेवढा ग्रामीण विकासाचा निधी आला या पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात विकासाची गंगा आली. हे सर्व युतीच्या माध्यमातून झाले. आम्ही लोकांसाठी काम करतो जिल्ह्यांमध्ये येणारा प्रत्येक पैसा लोकांचा आहे. खासदार लेखाजोगा तुमच्या सर्वांच्या हातात दिला. त्याचा निश्‍चित अभ्यास करा. गेली 30 वर्षे हा पूल बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत होते. कर्ली नदीवरील हा पूल बांधण्याचे वचन येथील ग्रामस्थांना दिले होते. अखेर हा पूल मंजूर करून ग्रामस्थांची स्वप्नपूर्ती झाली आहे. भविष्यात येथील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार आहे.

श्री. लाड म्हणाले, ""तुळसुली येथून कुडाळ येथे येण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे; मात्र नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. हा पूल मंजूर झाल्याने मांडकुली, तुळसुली साळगाव, भोयाचे केरवडे या गावांतील लोकांना याचा लाभ होणार आहे.''

नारळ फोडण्याचा अधिकार नीलेश राणेंना आहे का ? 
मुख्यमंत्री निधीतून झालेल्या कामांचा नारळ फोडण्याचा नीलेश राणे यांना अधिकार आहे का ? असा सवाल खास राऊत यांनी उपस्थित करीत ना तुम्ही आमदार, ना खासदार, ना सरपंच, ना सदस्य असा टोलाही लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Raut comment