मुंबई विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करणार - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

रत्नागिरी - केवळ इमारत बांधून किंवा फॉर्म भरण्याच्या सोयीने मुंबई विद्यापीठाचे येथील उपकेंद्र सक्षम होणार नाही. तर त्यासाठी अभ्यासक्रमांची संख्या वाढवणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना दिली.

 नारायण राणे भाजप, मोदींविरोधात बोलतात. त्यामुळे त्यांची खासदारकी परत घ्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपने केली आहे याबाबत ते म्हणाले की, पदाधिकार्‍यांचे मत, भावना जाणून घेऊन. सध्या अनेक राजकीय खेळी सुरू आहेत. जोपर्यंत उमेदवार स्पष्ट होत नाही तोपर्यंत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार नाहीत. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे तरीही टिका करतो. याबाबत योग्य वेळी पक्ष नेतृत्व विचार करेल. शिवसेनेने फिफ्टी 50 असा फॉर्म्युला काढलाय. याबाबत तावडे म्हणाले, आम्ही चर्चेला बसू त्यावेळी त्यांची मागणी विनंती, कळेल. अजून अशी मागणी आलेली नाही.

चले जाव आंदोलनावर चित्ररथ

26 जानेवारीला संचलनावेळी सर्वच राज्यांतर्फे महात्मा गांधीच्या 150 जयंतीनिमित्त राज्याशी संबंधित चित्ररथ  साकारले जाणार आहेत. महाराष्ट्राचा रथ हा चले जाव आंदोलनावर आधारित आहे. संरक्षण विभागाने त्याला मान्यता दिली आहे. गांधींचे विचार प्रभावीपणे सांगणारा हा रथ आहे, असे तावडे म्हणाले.

Web Title: Vinod Tavade comment