चांगल्या कार्यासाठी भराडी देवीस साकडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

मालवण - आंगणेवाडीच्या भराडी देवीस गतवर्षी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येऊ दे, असे गाऱ्हाणे घातले होते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. हे यश मातेच्या आशीर्वादानेच मिळाले आहे. भराडी मातेमुळेच मुंबईत भाजप वाढली आहे. यामुळे राज्यात चांगले कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त व्हावी, यासाठी आम्ही भराडी चरणी नतमस्तक झालो आहोत. मुंबईसह राज्याच्या विकासासाठी देवी भराडीने प्रेरणा द्यावी एवढीच आपली मनोकामना असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज आंगणेवाडी येथे सांगितले. 

भराडी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आज सकाळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजपचे नेते संदेश पारकर, विलास हडकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, अतुल काळसेकर, भाऊ सामंत, प्रभाकर सावंत, राजू राऊळ, जयदेव कदम, महेश मांजरेकर यांच्यासह मुंबईतील भाजपचे नगरसेवक, जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी भराडीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी भाजपचे राजन तेली तसेच अन्य मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, सिनेनाट्य अभिनेते अरुण कदम, दिगंबर नाईक या कलाकारांनीही भराडीचे दर्शन घेतले. 

भराडी देवी मंदिर परिसरातील भाजपच्या कार्यालयात श्री. तावडे, श्री. शेलार यांचे जिल्हा भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. या ठिकाणी श्री. तावडे यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ""आंगणेवाडीतील भराडी मातेची यात्रा प्रसिद्ध असून राज्याची ही सांस्कृतिक यात्रा सांस्कृतिक महोत्सव म्हणून साजरी व्हावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून येत्या काळात प्रयत्न केले जातील.'' भाजपतर्फे नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचाही या वेळी सत्कार झाला. भाजपतर्फे यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत चष्मा वाटप व नेत्रचिकित्सा शिबिर भरविले आहे. त्याचे उद्‌घाटनही मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. 

मुंबई महापालिका तसेच राज्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे हे सर्व यश आम्ही भराडी मातेस समर्पित करत आहोत. पारदर्शक कारभार करत असताना भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचे बळ आम्हाला दे, असे साकडे आज भराडी मातेला घातले आहे.'' 
- आशीष शेलार, अध्यक्ष मुंबई भाजप 

Web Title: vinod tawde bharadi devi