महाडमधील दाभोळ गावात डेंग्यूची साथ

सुनील पाटकर
बुधवार, 23 मे 2018

महाड तालुक्यात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तालुक्यातील दाभोळ गावात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. येथील मोहल्ला परिसरातील 15 रुग्ण डेंग्यूच्या तापाने आजारी आहेत. यामुळे दाभोळ गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. 

महाड : महाड तालुक्यात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तालुक्यातील दाभोळ गावात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. येथील मोहल्ला परिसरातील 15 रुग्ण डेंग्यूच्या तापाने आजारी आहेत. यामुळे दाभोळ गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. 

महाड खाडीपट्टा विभागातील दाभोळ गावात गेली 15 दिवसापासून थंडी तापाचे रुग्ण दिसू लागले होते. मात्र, बदलत्या तापमानामुळे आरोग्य बिघडत असल्याचे प्रथम दर्शनी जाणवले. परंतु, हि संख्या वाढत गेली. खाजगी रुग्णालयात हे रुग्ण दाखल झाले आणि विविध तपासणीअंती डेंग्यूचे निदान डॉक्टरांनी केले. ग्रामीण भागातील हे रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने सरकारी पातळीवर हि माहिती मिळण्यास विलंब झाला. महाड आणि दासगाव येथे विविध रुग्णालयात हे रुग्ण उपचार घेत आहेत. 

या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या दासगाव मध्ये हि माहिती मिळाल्यानंतर येथील पथकाने दाभोळ गावात भेट दिली. याठिकाणी असलेल्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. ग्रामीण पातळीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली आहे. शिवाय आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव मधून सांगण्यात आले आहे. येथील नागरिकांचे आणि रुग्णाचे रक्त संकलन करून तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. रायगड जिल्हा आरोग्य विभागाकडून देखील गावाची पाहणी करण्यात आली. या विभागाने देखील विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. 

दाभोळ गावात असलेल्या मोहल्ला परिसरात असलेल्या गटारांवर मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास आहे. त्यातच या उघड्या गटारांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

"डेंग्यूचा उपचार सर्व सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे. हा विषाणूजन्य आजार असल्याने लागण झालेल्या रुग्णाने आराम करणे, भरपूर पाणी पिणे, हलके जेवण, ताप आल्यास लगेचच प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क करावा."
 डॉ. विशाल पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव

Web Title: viral of dengue in mahad