सिंधुदुर्गातील वीज प्रश्‍न सुटणार 

सिंधुदुर्गातील वीज प्रश्‍न सुटणार 

कणकवली - कृषी पंपांची जोडणी, जुने वीज खांब व वीज तारा बदलणे, गावागावात होणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या सोडविणे आदींसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने 5 हजार कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे कालावधीत वीज पुरवठ्यातील बहुतांश समस्या मार्गी लागतील, असा विश्‍वास कंपनीचे संचालक विश्‍वास पाठक यांनी येथे व्यक्‍त केला. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अचूक नियोजनामुळे राज्य भारनियमनमुक्‍त झाले आहे. शेतकऱ्यांना अखंडितपणे 8 तास वीज पुरवठा केला जातोय. मागील 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पूर्ण केली आहेत. आता उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी "एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर' योजना राबविली जात असल्याचीही माहिती पाठक यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (म. रा. वि. मं.) सूत्रधारी कंपनीचे संचालक पाठक यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन विविध योजनांची माहिती दिली. प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे, मुख्य अभियंता तथा जनसंपर्क अधिकारी रंजना पगारे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता संजय गवळी, उपकार्यकारी अभियंता भगत आदी उपस्थित होते. 

महावितरणची रिक्‍तपदे लवकरच भरणार 
महापारेषण, महावितरण व महानिर्मितीचे विद्युत जाळे सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. शेतीला दिवसा सलग आठ तास वीज मिळावी यासाठी उपकेंद्र सौरऊर्जा निर्मिती व स्वतंत्र वाहिनीचे काम करण्यात येत आहे. महावितरणची रिक्‍तपदे लवकरच भरणार आहोत. मागील चार वर्षात साडे चार लाख कृषी पंप जोडणी दिली अशीही माहिती पाठक यांनी दिली. 

विजेची मागणी व पुरवठ्याचे गणित जुळवून आम्ही महाराष्ट्र राज्य भारनियमनमुक्त केले आहे. राज्याची विजेची मागणी 18 हजार मेगावॅटवरुन 25 हजार मेगावॅटपर्यंत पोचली. तरीही 24 तास सुरळीत व स्वस्तात वीजपुरवठा करण्यात यशस्वी ठरलो आहोत.'

- विश्‍वास पाठक​

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com