अजब कारभार ! लोकसभेला मतदान, विधानसभेला नाव यादीतून गायब

Voting List Name Issue In Sangmeshwar Taluka
Voting List Name Issue In Sangmeshwar Taluka

देवरूख ( रत्नागिरी) - यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी तरूणाने आणि त्याच्या आईने मतदान केले मात्र विधानसभा निवडणुकीच्यावेळी दोघांनाही मतदान करता आले नाही. हा प्रकार त्यांच्या स्वतःमुळे नाही तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडला असून याविरोधात त्यांनी देवरूख तहसीलदारांकडे दाद मागितली आहे. 

संगमेश्‍वर तालुक्‍यातील सोनवडे गावातील मंगेश मोहन चाळके यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. या विरोधात त्यांनी देवरूख तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात 21 ऑक्‍टोबर 2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ते आणि त्यांची आई वनीता मोहन चाळके हे दोघेही आवश्‍यक ती कागदपत्र घेऊन नियमित मतदान केंद्रावर गेले होते. मात्र केंद्रात दोघांनाही मतदान करण्यास मनाई करण्यात आली. त्याचे कारण तेथील अधिकाऱ्यांना विचारले असता या दोघांचेही नाव मतदार यादीत नसल्याचे सांगण्यात आले.

मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप

गावातील मतदार यादीचा पुरावाही त्यांनी यावेळी दाखवला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी दोघांनीही मतदान केल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले मात्र काहीही न ऐकता त्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मंगेश आणि त्यांच्या आईचे नाव मतदार यादीत होते मात्र विधानसभा निवडणुकीवेळी ते गायब झाल्याने त्यांना धक्‍का बसला. त्यांनी संपूर्ण यादी पुन्हा छाननी केली असता त्यात त्या दोघांचेही नाव नसल्याचे दिसून आले.

वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त

वास्तविक नाव वगळणे वा स्थलांतराबाबत मंगेश यांनी संबंधित विभागाकडे कोणताही अर्ज केला नव्हता तरीही त्यांचे नाव वगळण्यात आल्याने त्यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. याबाबत सखोल चौकशी करून राष्ट्रीय कर्तव्यापासून लांब ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंगेश यांनी या निवेदनातून केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com