भुकेसाठी भटकंती बिबट्यांच्या मुळावर

सिद्धेश परशेट्ये
बुधवार, 12 एप्रिल 2017

खेड - उन्हाळ्यात जंगलात पाण्याचे स्रोत कोरडे पडतात. त्यामुळे जंगली श्‍वापदांना पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी अन्न मिळत नाही. परिणामी मानवी वस्तीत प्राणी येतात. त्यात त्यांचा अंत ओढवतो. गेल्या पाच वर्षात खेड तालुक्‍यात दोन बिबट्यांचा मृत्यू याच पद्धतीने झाला आहे. त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याचा हा परिणाम आहे. प्राण्यांना अन्न, पाण्यासाठी दूर दूर भटकंती करावी लागते. डोंगर कपारीतील पाण्याचे स्रोत लोप पावल्यामुळे पाण्याअभावीही या जनावरांचे मृत्यू होत आहेत.

तालुक्‍यासह शहरी भागातील मानवी वस्तीकडे बिबट्यांचा संचार वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत कशेडी-देवाचा डोंगर, असगणी, मोरवंडे, आंबवली, बिरमणी, वडगाव, सवणस, शिव या ठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. शिव, मोरवंडे, आंबवली, सवणस या ठिकाणी बिबट्यांने जनावरांवर तसेच नागरी वस्तीत घुसून हल्ला केल्याच्या घटना ताज्या आहेत. बिबट्याचा वावर ग्रामीण भागातील गाव-वाड्यातून नागरिकांना आढळून आल्याच्या ताज्या घटना लक्षात घेणे आवश्‍यक आहे. तालुक्‍यात सद्यःस्थितीत १५ ते १८ बिबटे असल्याची नोंद आहे. आंबवली परिसरातील व्याघ्र प्रकल्पांच्या सीमावर्ती भागातील जंगलात बिबट्याचे वास्तव्य सर्वाधिक आहे. वन विभागाचे आदेश पायमल्ली तुडवत बिबट्याचे आश्रयस्थान नष्ट केले जात असल्याने तो निवारा अन्‌ भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे वळत आहे. 

पाच वर्षांपूर्वी तालुक्‍यातील सोनगाव-धामणदेवी येथील जंगलात २०१२ च्या मार्च महिन्याच्या अखेरीस बिबट्या मृत आढळला. बिबट्याचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचा अहवाल येथील वन विभागाला प्राप्त झाला होता. भुकेमुळेच शेतकऱ्यांच्या जनावरांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. दोन महिन्यांत कशेडी-देवाचा डोंगर, असगणी, मोरवंडे, आंबवली, बिरमणी, वडगाव, सवणस आदी ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे दाखल झाल्या आहेत.

‘‘गेल्या पाच वर्षांतील ही दुसरी घटना आहे. बिबट्यांचा मृत्यू हा भुकेमुळेच झालेला आहे. उन्हाळ्याच्या दरम्यान जंगलात लागणारे वणवे व पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यामुळेच ह्या घटना घडत आहेत.’’

- एस. बी. मोहिते, वनपाल

Web Title: wandering leopard appetite for the roots of