रायगड - पालीत कचऱ्याची समस्या गंभीर

अमित गवळे
शुक्रवार, 29 जून 2018

पाली (रायगड) : अष्टविनायाकापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत ठिकठिकाणी कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. ग्रामपंचायतीने नव्याने बसविलेल्या प्लास्टिक डस्टबीन ट्राॅल्यांचा (कचरा कुंड्यांचा) प्रयोग देखिल फसला आहे.

पाली (रायगड) : अष्टविनायाकापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत ठिकठिकाणी कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. ग्रामपंचायतीने नव्याने बसविलेल्या प्लास्टिक डस्टबीन ट्राॅल्यांचा (कचरा कुंड्यांचा) प्रयोग देखिल फसला आहे.

पालीत या अाधी सिंमेंटच्या तसेच विटांचे बांधकाम असलेल्या कचरा कुंड्या होत्या. त्या तुटल्या व मोडकळीस अाल्या होत्या. त्यातून घाण व कचरा वारंवार बाहेर येत होता.यावर उपाय म्हणून मागील वर्षी ग्रामपंचायतीने विविध ठिकाणी ४० डस्टबीन (प्लास्टिक कचरा कुंड्या किंवा ट्राॅली) ठेवल्या होत्या. मात्र सध्या या प्लास्टिक डस्टबिन ट्राॅलीची पुरती दुरवस्था झाली आहे. तसेच या कचराकुंड्या अपुर्या क्षमतेच्या अाहेत. कुत्रे व गुरेढोरे येथे खाणे शोधण्यासाठी जातत व हे डस्टबीन रस्त्यावर पाडतता. त्यामुळे रस्त्यावर घाण व कचरा पसरतो. तसेच ह्या प्लास्टिक डस्टबीन ट्राॅली फुटल्या देखील अाहेत. यातूनही कचरा बाहेर येतो. परिणामी घाण अाणि कचर्यामुळे नागरिकांचे अारोग्य धोक्यात आले आहे.

पालीत प्रवेश केल्यावरच अनेक ठिकाणी कचर्याचे ढिग पहायला मिळतात. काही ठिकाणी प्लास्टिक डस्टबीन व कचरा कुंड्या नसल्याने लोक नाईलाजाने कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत रोज कचरा उचलाला जातो परंतू हा कचरा पुन्हा जमा होतो. 

कचरा वेळच्यावेळी काढला जातो. मात्र गुरे व कुत्रे कचऱ्याच्या ट्राॅल्या पाडता व कचरा अस्ताव्यस्त करतात. दोन तीन दिवसांत प्रत्येक सोसायटीमध्ये ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी डस्टबीन ट्राॅल्या वाटण्यात येणार आहेत. घंटा गाडी फिरुन हा कचरा गोळा करणार आहे. नागरिकांनी अापला कचरा रस्त्यावर न टाकता तो डस्टबीनमध्ये ठेवावा अाणि घंटागाडी अाल्यावर त्यामध्ये टाकावा. 
- जनार्दन जोशी, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पाली. 

सर्वत्र पसरणाऱ्या कचऱ्यामुळे नागरीकांचे अारोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक बंदी असुनही प्लास्टिकचा कचरा सर्वत्र दिसत आहे. कचराकुंडी बाहेर, रस्त्यावर व गटारात कचरा टाकणार्यांवर ग्रामपंचायतीने नोटीसा पाठवून कारवाई करावी. 
- निलेश धारीया, पत्रकार, पाली

Web Title: waste management issue in pali raigad