‘पाणी हरवलं, कोणी ते चोरलं’मधून जलजागृती

‘पाणी हरवलं, कोणी ते चोरलं’मधून जलजागृती

दाभोळ - कृषी महाविद्यालय, दापोलीच्या विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर पथनाट्य ‘पाणी हरवलं, कोणी ते चोरलं’ सादर केले. या पथनाट्यातून त्यांनी ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ हा संदेश दिला. त्याचप्रमाणे शेतीसाठी  पाणी वापरत असताना ठिबक सिंचन व तुषार सिंचन यांसारख्या सुधारित सिंचन पद्धतींचा तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या जलकुंड, शेततळी, विजय बंधारा या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा संदेश दिला.

कृषी महाविद्यालय दापोलीचा विस्तार शिक्षण विभाग व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, साखळोली नं. १ यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित जलदिनानिमित्त जलजागृती फेरी व जलसंवर्धन मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी पथनाट्य सादर केले. त्यात रोहन कारोटे, शुभम पवार, शुभम गायकवाड, अश्विनी शिंदे, शिवानी नाईक, ऋतुजा ठाकूर, माउली चिवारे, अमृता भिसे, प्रतीक्षा काळे, अचला घरटकर, अनुजा आखाडे, अक्षदा माने, अक्षता मिसाळ, पूनम पवार, प्रणाली सावंत आणि सीमा खाडे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.

वाढती लोकसंख्या, पाणी वापरातील नियोजनाचा अभाव यामुळे दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी घटत आहे. आपण आताच याबाबत जागरूक होऊन पाणी वाचवले पाहिजे, त्याचा नियोजित वापर करून आपले भविष्य  सुरक्षित केले पाहिजे. याबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा प्रसारही केला आहे.  शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सुभाष चव्हाण यांनी साखळोलीतील या मेळाव्यात केले. या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत, प्रा. डॉ. दीपक हर्डीकर, विस्तार प्रशिक्षण अधिकारी डॉ. महेंद्र भैरमकर, साखळोलीच्या सरपंच सौ. कांचन गौरत, सौ. योगिता गोवळकर, प्राथमिक शिक्षक राजू गायकवाड, अनंत बडबे, लिंगोजी वाघमारे, प्रगतिशील शेतकरी शांताराम शिंदे, अनिल बुरटे, विनोद गोरिवले, रमेश गौरत आदी उपस्थित होते. 

प्रास्ताविकामध्ये डॉ. सावंत यांनी शासनाचे ‘जलसप्ताह’ अभियान, पाणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने करावयाचे प्रयत्न व या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. जलफेरीमध्ये कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, पूर्ण प्राथमिक शाळा, साखळोली नं. १ चे विद्यार्थी, शिक्षकवृंद, महाविद्यालयाचे अधिकारी- कर्मचारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. जलफेरीचे नेतृत्व जलपरी कु. अश्विनी नेतनवार हिने केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com