राजिप शाळा पायरीचीवाडी मधील लहानग्यांनी भागविली पक्ष्यांची तहान

अमित गवळे
रविवार, 22 एप्रिल 2018

उन्हाळ्यातही सहज पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल, यासाठी उपयोगात नसलेल्या पाण्याचा बाटल्यांचा वापर पाणी ठेवण्यासाठी करण्यात आला. 

पाली (जि. रायगड) - उन्हाच्या तडाखा वाढला अाहे.त्यामुळे अनेक छोटे मोठे पाणवठे देखील अाटले अाहेत. अशा वेळी मुक्या पक्षांची पाण्यावाचून तडफड होते. हि तडफड थांबावी व पक्षांचा जीव वाचावा यासाठी सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीचीवाडी येथील विद्यार्थ्यांनी पक्षांचे अाधिवास व झाडांवर पाण्याचे भांडे ठेवून पक्ष्यांची तहान भागवली आहे. शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शिक्षक कुणाल पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला.

शिक्षक पवार यांनी विद्यार्थ्याशी अनौपचारिक चर्चा करत असतांना विद्यार्थ्याना विचारले, या कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी माणसांचे एवढे हाल होतात तर पक्ष्यांचे काय होत असेल? आपण त्यासाठी काय करु शकतो? विद्यार्थी विचार करु लागले व अनेक उपाय स्वंयकल्पनेतून सांगू लागले. पक्ष्यांसाठी आपण जर जागोजागी व झाडावर पाण्याचे भांडे ठेवले तर पक्ष्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकेल व त्यांची तहान भागेल. ही संकल्पना सर्वांनाच खूपच आवडली व आपण असेच करुया असे ठरले. विद्यार्थी व शिक्षक पवार परिसरातील झाडांवर व आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भांडे ठेवले अाणि त्यात विद्यार्थ्यांनी पाणी भरुन ठेवले. जेणेकरुन पक्ष्यांना उन्हाळ्यातही सहज पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल. उपयोगात नसलेल्या पाण्याचा बाटल्यांचा वापर पाणी ठेवण्यासाठी करण्यात आला. टाकाऊ वस्तुंचा टिकाऊ व योग्य उपयोग केला गेला. विद्यार्थी हा उपक्रम राबवित असतांना खूप आनंदी व उत्साही होती. शाळेला सुट्टी लागली तरी आम्ही सर्वजण त्या भांड्यात पाणी टाकू,अशी जबाबदारी विद्यार्थ्यांनी उचलली. या आधीही कुणाल पवार यांनी विद्यार्थ्याच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे कर्तव्य ओळखून झाडांना राखी बांधून प्रबोधनात्मक रक्षाबंधन साजरे केले होते.

Water For Birds

तीव्र उष्णतेमुळे सध्या तापमानाचा पारा खूप जास्त वाढला आहे. उन्हाचे चटके सोसेनासे झाले आहेत. मार्च,एप्रिल व मे ह्या तीन महिन्यात तर उन्हाळा नकोसा वाटतो. अशात,कुणाल पवार व त्यांच्या विद्यार्थ्यानी राबविलेला उपक्रम निश्चितच अनुकरणीय व कौतुकास्पद आहे. अशा शब्दात या उपक्रमाचे सुधागडचे गटशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्याचे बालमन हे संस्कारक्षम व अनुकरणशील असते.प्राणीमात्रांवर दया करा हा संदेश फक्त पुस्तकात न राहता त्याला कृतीची जोड दिल्यास विद्यार्थ्याच्या मनावर आपोआप ते बिंबवले जाईल. - कुणाल पवार, शिक्षक, रा.जि.प.शाळा पायरीचीवाडी

आमच्या भांड्यातील पाणी पक्षी पिऊन त्यांची तहान भागवतील. त्यामुळे मला खूप आनंद व समाधान मिळाले आहे. आम्ही दररोज त्या भाडयांत पाणी टाकू. हा उपक्रम राबवितांना आम्ही खूप - खूप मजा केली. - कुणाल खाडे, विद्यार्थी, इ. ३ री

Water for birds

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Water For Birds Activity By School Students