नगरपंचायतीने पळवले लोकांच्या तोंडचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

गुहागरातील स्थिती - महावितरणकडे बोट; साठा भरपूर, पुरवठ्याबाबत ओरड
गुहागर - जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. भर उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध असताना गुहागर नगरपंचायतीने पाणीपुरवठा बंद करून गुहागरकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. याबाबत महावितरणवर ठपका ठेवला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, असे कारण दिले आहे.

उन्हाळ्यामुळे नेहमीच्या वापरापेक्षा अधिक पाणी लागते. त्यामुळे पाणी पुरत नाही. सलग दोन आठवड्यात गुहागर नगरपंचायतीचे नळ कोरडे राहिले. महावितरणची वीजवाहिनी सदोष असल्याने नगरपंचायतीचे पंप बंद पडले. त्यामुळे एक दिवस पाणी आले नाही. १७ मे रोजीही वीजपुरवठ्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. १८ मे रोजी शिवाजी चौकात जलवाहिनीला गळती लागली. तिच्या दुरुस्तीमुळे शहरात पाणीपुरवठा झाला नाही.

नगरपंचायतीने १८ मे रोजी पाणी येणार नाही, याची माहितीही त्याचदिवशी सकाळी दिल्याने नागरिकांची पंचाईत झाली. १७ मे रोजी पाणी येणार नाही हे माहिती असल्याने १८ ला पाणी येईल, असे गृहित होते; मात्र सकाळच घोषणेने धक्का बसला. पाणीपुरवठा करणाऱ्या जलायशात मुबलक पाणी आहे. तरीही ढिल्या कारभारामुळे शहरवासीय टंचाईला तोंड देत आहेत. 

त्रुटी वीजपुरवठ्यात
पाणीपुरवठा सभापती जयदेव मोरे म्हणाले, की पाणीपुरवठा योजनेत त्रुटी नाहीत. प्रश्न वीजपुरवठ्याचा आहे. कधी आवश्‍यक दाबाने वीजपुरवठा नाही, तर कधी वीजवाहिनी ट्रीप होते. महावितरण कार्यालयात आवश्‍यकता सहा कर्मचाऱ्यांची आहे, पण फक्त दोन आहेत, त्यांच्याकडे आरे, गुहागर, असगोली असा जादा भार. दोन दिवसांपूर्वी मी महावितरण आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसोबत रात्री दोन वाजेपर्यंत वीज वाहिनीवरील दोष शोधला. सोमवारी सर्व कामे पूर्ण करून घेणार आहोत.

Web Title: Water on the face of people fleeing the Nagar Panchayat